महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जारी केलेले परिपत्रक क्षणात मागे घेण्याची नामुष्की

06:24 AM Feb 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गोमेकॉचे नोडल अधिकारी बनले विरोधकांचे टार्गेट

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

Advertisement

गोमेकॉ आवाराबाहेरील गाड्यांवर खाद्यपदार्थ बनविण्यासाठी शुद्धीकरण केलेल्या सांडपाण्याचा वापर करण्यात येत असल्याचा दावा करून ते खाद्यपदार्थ खाऊ नयेत, असा आदेश आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना जारी करणारे नोडल अधिकारी डॉ. उदय काकोडकर यांच्या परिपत्रकामुळे शनिवारी राज्यात मोठा गदारोळ माजला. त्यानंतर लगेचच त्यांनी सदर परिपत्रक मागे घेत असल्याचे परिपत्रक जारी केले.

बांबोळीत गोमेकॉ आवाराबाहेर गाडे, हॉटेल्स चालविण्यास परवाने देण्यात आलेले व्यावसायिक खाद्यपदार्थ बनविण्यासाठी शुद्धीकरण केलेले सांडपाणी वापरतात. तेच पाणी ग्राहकांना पिण्यासाठीही देण्यात येते. मात्र ते पाणी गोमेकॉच्या सुपर स्पेशालिटी विभागातील सांडपाणी आहे. त्यावर शुद्धीकरण करून ते गार्डनिंगसाठी वापरण्यात येते. ही शुद्धीकरण प्रक्रिया योग्यरित्या झालेली नसते. त्यामुळे ते पाणी पिण्यासाठी योग्य नाही. असे पाणी प्यायल्यास आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, याची सर्व विभाग प्रमुखांनी दखल घ्यावी व आपापल्या विभागातील डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांना त्या गाड्यांवरील खाद्यपदार्थ खाऊ नयेत, पाणीही पिऊ नये, यासंबंधी सूचना द्याव्यात, असे परिपत्रकातून डॉ. काकोडकर यांनी कळविले होते.

डॉ. काकोडकर यांनी जारी केलेले परिपत्रक जरी कार्यालयीन कामकाजाचा भाग असले तरी नंतर कुणीतरी ते व्हायरल केल्यामुळे राज्यभरात गदारोळ माजला. विरोधकांना ही आयतीच संधी मिळाल्यामुळे तेही त्यांच्यावर तुटून पडले. खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी दूषित पाणी वापरण्यात येत असल्याचे माहीत होते तर अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) तक्रार का केली नाही? त्यांची तपासणी का केली नाही? एवढेच नव्हे तर 24 तासांच्या आत परिपत्रक का मागे घेतले. त्यामागील खरा सूत्रधार कोण? यासारखे अनेक प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले.

 परिपत्रक घेतले मागे

दरम्यान, सदर परिपत्रकावरून राज्यभरात गदारोळ माजल्यानंतर डॉ. काकोडकर यांनी लगेचच नव्याने नोटीस जारी करून सदर परिपत्रक मागे घेत असल्याचे कळविले. सदर परिपत्रक हे गोमॅकोच्या कर्मचाऱ्यांना सावध करण्यासाठी होते. ती अंतर्गत बाब होती. तिचा सामान्य जनतेशी कोणताही संबंध नव्हता, असे त्यांनी नंतर पत्रकारांकडे बोलताना स्पष्ट केले आहे.

वादग्रस्त आदेशाची पंतप्रधानांनी दखल घ्यावी : पणजीकर

सायंकाळी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रसारमाध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी तर, आधी गंभीर आरोप करून नंतर घुमजाव करणाऱ्या डॉ. काकोडकर यांच्या वादग्रस्त आदेशाची थेट पंतप्रधानांनीच दखल घ्यावी अशी मागणी केली. तसेच याप्रश्नी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण मागावे, असेही ते म्हणाले.

अशा प्रकारे परस्पर परिपत्रक जारी करून खरे तर डॉ. काकोडकर यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा पर्दाफाशच केला आहे, असा दावा पणजीकर यांनी केला. यापूर्वी पाण्याचे टँकर सांडपाणी वाहून नेत असल्याचा प्रकार काँग्रेसने उघडकीस आला होता. तेव्हा सदर प्रशासन हाच एक मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला होता. सध्या गाजणाऱ्या प्रकारावरून तो आरोप आता सिद्ध झाला आहे, असे पणजीकर म्हणाले.

डॉ. काकोडकर यांनी जारी केलेले परिपत्रक हे गोमेकॉत कॅन्टीन व्यवसाय चालविणाऱ्या ‘सोडेक्सो’ सारख्या कंपन्यांच्या हितासाठी होते. त्यांचा धंदा बहरावा या पुळक्यातून ते जारी करण्यात आले होते, असा दावा पणजीकर यांनी केला. म्हणूनच सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्या पदाची मान, प्रतिष्ठा, पत राखावी. राजकर्त्यांच्या हाताखालचे बाहुले बनू नये, असा सल्ला त्यांनी दिला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article