For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सत्तरी तालुक्यातील धबधब्यांवर ‘नो एंट्री’

01:27 PM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
सत्तरी तालुक्यातील धबधब्यांवर ‘नो एंट्री’
Advertisement

कडक अंमलबजावणी करण्याचे वन खात्याचे वनाधिकाऱ्यांना निर्देश : दगड कोसळून अपघात घडण्याची भीती 

Advertisement

वाळपई : सध्या पावसाळा सुरू झालेला  असून डोंगरावरून कोसळणाऱ्या धबधब्याच्या प्रवाहातून दगड खाली कोसळून अपघात घडण्याची शक्मयता आहे. यामुळे धबधब्यावर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घालण्यात आलेली आहे. वन खात्याने एक अध्यादेश जारी केल्यामुळे निसर्गप्रेमी व पर्यटकांची गोची झालेली आहे. सत्तरी तालुक्मयातील अनेक धबधबे निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. येथील धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. विशेषत: आठवड्याच्या शनिवारी व रविवारी त्याचप्रमाणे सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात निसर्गप्रेमी व पर्यटक धबधब्याच्या ठिकाणी मौजमजा करण्यासाठी जात असतात.  सत्तरीतील चरावणे, हिवरे, पाली, सालेली. नानेली, कुमठोळ येथील धबधबे सुप्रसिद्ध आहेत. याठिकाणी जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण नाही. यामुळे या धबधब्यांवर निसर्गप्रेमी व पर्यटक आपली पसंती  दर्शवितात.सध्या पाऊस सुरू झालेला आहे. धबधबे कोसळण्यास सुरू झाल्यानंतर डोंगराच्या माथ्यावरून धबधब्याच्या प्रवाहासोबत मोठे दगड खाली येण्याची शक्मयता असते. त्याचा धोका पर्यटकांना पोचू शकतो. यामुळे धबधब्याच्या ठिकाणी जाण्यासाठी वन खात्याने पूर्णपणे बंदी घातलेली आहे. या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश खात्याने वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

निसर्गप्रेमी, पर्यटकांनी सहकार्य करावे

Advertisement

तालुक्मयातील धबधबे हे खासकरून राखीव जंगल व अभयारण्याच्या क्षेत्रात येत आहेत. यामुळे या ठिकाणी जाण्यासाठी प्रतिबंध करण्यात आले आहे. पर्यटकांनी व निसर्गाप्रेमींनी कोणत्या प्रकारची हुल्लडबाजी न करता पुढील आदेश येत नाही तोपर्यंत धबधब्याच्या ठिकाणी जाऊ नये. तशी कृती कुणी केल्यास वन खात्याच्या कायद्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा वन अधिकाऱ्यांनी दिलेला आहे. तरी पर्यटक आणि निसर्गप्रेमींनी सहकार्य करावे, असे आवाहनही वन अधिकाऱ्यांनी केले आहे.

 

Advertisement
Tags :

.