For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

घरपोच सिलिंडर देण्यासाठी ‘डिलिव्हरी चार्जेस’ घेऊ नये

11:42 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
घरपोच सिलिंडर देण्यासाठी ‘डिलिव्हरी चार्जेस’ घेऊ नये

राज्य सरकारचा वितरकांना आदेश : ग्राहकांच्या तक्रारीची घेतली दखल

Advertisement

पणजी : घरगुती गॅस (एलपीजी) सिलिंडर घरपोच देण्यासाठी ग्राहकांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये आणि ग्राहकांनी ते देऊ नयेत, असे निर्देश सरकारतर्फे सिलिंडर वितरकांना दिले आहेत. ते शुल्क सिलिंडरच्या खर्चात समाविष्ट असते आणि ते ग्राहक देतातच असा खुलासाही त्यातून करण्यात आला आहे. घरगुती गॅस सिलिंडर वितरित करणाऱ्या हिंदूस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन या सर्व कंपन्यांनी ते निर्देश पाळावेत तसेच स्वत:च्या वितरकांनाही त्याचे पालन करण्याची सूचना द्यावी, असे सरकारने काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. गॅस सिलिंडर घरपोच दिल्यानंतर काही कंपन्या किंवा त्यांचे वितरक ‘डिलिव्हरी चार्जेस‘ म्हणून तीस ते चाळीस रुपयांपर्यंत अतिरिक्त रक्कम घेतात अशा तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. त्याची दखल घेऊन सरकारने जनतेच्या माहितीसाठी वरील आदेशाची अधिसूचना जारी केली आहे. शहरी भागात हे अतिरिक्त शुल्क सहसा घेण्यात येत नाही. ग्रामीण भागात डिलिव्हरी चार्जेस मागितले जातात आणि ते देण्यात येतात. ग्राहकांनी त्याची दखल घेऊन अतिरिक्त पैसे मागितले गेल्यास संबंधित खात्याकडे तक्रारी कराव्यात असे आवाहन अधिसूचनेतून करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.