महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘एनएमसी’च्या नव्या लोगोमध्ये आता ‘भारत’

06:22 AM Dec 02, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हिंदू देवतेचा फोटो वापरल्याने वाद

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) आपला अधिकृत लोगो बदलला आहे.  ‘एनएमसी’ने इंडिया हा शब्द बदलून भारत असा देशाचा उल्लेख केला आहे. याशिवाय लोगोमध्ये आयुर्वेदाची देवता धन्वंतरी यांचा रंगीत फोटोही जोडण्यात आला आहे. या लोगोवरून वाद निर्माण झाल्यानंतर जुन्या लोगोमध्ये धन्वंतरीचे कृष्णधवल रेखाटनही असल्याचे ‘एनएमसी’ने आपल्या बचावात म्हटले आहे. नव्या लोगोमध्ये कोणतेही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले नसून खळबळ उडवून देण्यासारखे काही नाही. कृष्णधवल रेषांनी बनलेली धन्वंतरीची प्रतिमा लोगोमध्ये आधीपासूनच होती. ही प्रतिमा आता रंगीत स्वरुपात वापरण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आली असून एनएमसीच्या सर्व सदस्यांनी त्याला एकमताने मंजुरी दिली असल्याचे एनएमसीचे कार्याध्यक्ष बी. एन. गंगाधर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी लोगोमधील इंडिया हे नाव बदलून भारत करण्यात आल्याची कबुली दिली. मात्र, हा मुद्दा समोर आल्यापासून लोगोमधील या बदलांवरून वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग ही भारतीय वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय व्यावसायिकांचे नियमन करणारी देशाची सर्वोच्च संस्था म्हणून ओळखली जाते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article