महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नितीशकुमारांकडून चरणस्पर्शाचा प्रयत्न

06:09 AM Nov 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पण पंतप्रधान मोदी यांच्या अनपेक्षित कृतीमुळे सभास्थानी सारे उपस्थित आश्चर्यचकित

Advertisement

वृत्तसंस्था / दरभंगा

Advertisement

बिहारच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विकासकामांना चालना दिली आहे. दरभंगा येथे भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या रुग्णालयाची कोनशीला स्थापन झाल्यानंतर व्यासपीठावर असा प्रसंग घडला की सारे उपस्थित आश्चर्यचकित झाले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चरणस्पर्श करण्याचा प्रयत्न केला.

तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीशकुमारांचे हात आपल्या पावलांना लागण्यापूर्वीच त्यांना आवरले आणि त्यांचे हात धरुन त्यांना उभे केले. नंतर त्यांनी नितीशकुमार यांचे हात हातात घेऊन त्यांच्याशी हस्तांदोलन केले. हा सर्व नाट्यामय प्रसंग पाहून या कार्यक्रमाला उपस्थित असणारे लोक आश्चर्यचकित झाल्याचे दिसून आले. या प्रसंगाची चर्चा नंतरही लोकांमध्ये होत राहिली.

हा तिसरा प्रसंग

तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चरणस्पर्श करण्याचा प्रयत्न करण्याची नितीशकुमार यांची ही प्रथम वेळ नव्हती. जून महिन्यात संसदेच्या मध्यवर्ती सभागृहातही नितीशकुमार यांनी असा प्रयत्न केलेला होता. तर एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असतानाही कुमार यांनी एका प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाय काही क्षण धरलेलेही होते.

संबंध जवळचे आणि दूरचेही

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांच्यात नेहमीच ‘लव्ह-हेट’ संबंध राहिले आहेत. भारतीय जनता पक्षाने 2013 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय राजकारणात आणल्यानंतर नितीशकुमार नाराज झाले होते. त्यांनी भारतीय जनता पक्षाशी असलेली 18 वर्षांची युती तोडून बिहारमध्ये लोकसभा निवडणूक स्वतंत्ररित्या लढून पाहिली होती. पण दारुण पराभव सहन करावा लागल्याने पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवूनही घेतले होते. नंतर त्यांनी पुन्हा बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्याशी हातमिळवणी करुन बिहारची विधानसभा निवडणूक 2015 मध्ये जिंकली होती. तथापि, नंतर पुन्हा त्यांनी भारतीय जनता पक्षाशी मैत्री करुन राष्ट्रीय लोकशाही आघाडीत पुन्हा प्रवेश केला होता. आता ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीतच असून केंद्रातील सरकारला त्यांच्या पक्षाचे असणारे समर्थन अत्यंत महत्वाचे आहे. दरभंगा येथे घडलेल्या प्रसंगावरुन नजीकच्या भूतकाळातील या आठवणीही ताज्या झाल्या आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media
Next Article