महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आ. नितेश राणेंची "मोदी एक्सप्रेस" दादरहून कणकवलीकडे रवाना

03:58 PM Sep 04, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

कणकवली / प्रतिनिधी

Advertisement

कणकवली, देवगड, वैभववाडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी गणेश चतुर्थी निमित्त मुंबईतून गावी येण्यासाठी चाकरमान्यांसाठी सोडलेली मोफत मोदी एक्सप्रेस रेल्वे बुधवारी ४ सप्टेंबर रोजी रवाना झाली. आमदार नितेश राणे यांनी या मोदी एक्सप्रेसला दादर रेल्वे स्टेशनवर भाजपचा झेंडा दाखवून कोकणात रवाना केले.आमदार राणे यांचे चाकरमान्यांसाठी रेल्वे सोडण्याच्या सेवेचे हे सातत्यपूर्ण १२ वे वर्ष आहे. सुमारे अडीज हजार चाकरमानी या मोदी एक्सप्रेस मधून गावाकडे रवाना झाले.
दादर रेल्वे स्टेशनवर मोदी एक्सप्रेस मधून गावी जाण्यासाठी सकाळीच मोठी गर्दी झाली होती. बुकिंग असलेले रेल्वे तिकीट प्रत्येकाने आपल्या सोबत घेतले होते. आमदार नितेश राणे यांनी या मोदी एक्सप्रेसला भाजपचा झेंडा दाखवण्यापूर्वी चाकरमान्यांची भेट घेत आस्थेने चौकशी केली. ज्येष्ठांचे आशीर्वादही घेतले. त्यानंतर ही रेल्वे कोकणाकडे रवाना झाली. यावेळी आमदार नितेश राणे यांना अशीच समाजसेवा करण्यासाठी दीर्घायुष्य आणि सातत्यपूर्ण विजय मिळत राहो असे मालवणी भाषेत गाऱ्हाणे चाकरमानानी गणपती बाप्पाला घातले.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun Bharat news update # tarun Bharat sindhudurg # Modi express # nitesh Rane # kankavli
Next Article