For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निरंजनने मारले संतीबस्तवाड मैदान

09:50 AM May 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
निरंजनने मारले संतीबस्तवाड मैदान
Advertisement

आखाड्यात तीस चटकदार कुस्त्या : यात्रेनिमित्त केले आयोजन

Advertisement

वार्ताहर /किणये

संतीबस्तवाड गावातील दुर्गादेवी व बसवेश्वर यात्रेनिमित्त कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आलेल्या कुस्ती मैदानात निरंजन येळ्रूरने गणेश निट्टूरला आकडी डावावर चित्रपट करत संतीवस्तवाड कुस्ती मैदान जिंकले. मैदानात 30  चटकदार कुस्त्या झाल्या. हलगी रणवाद्यांच्या गजरात व शेकडो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत आखाड्यात प्रथम क्रमांक ची कुस्ती निरंजन व गणेश  यांच्यात झाली ही कुस्ती जवळपास 15 मिनिटे रंगतदार अशी झाली यामध्ये निरंजन आकडी डावावर गणेशचा पराभव केला. या कुस्तीसाठी पंच म्हणून धुंडेश यांनी काम पाहिले. यांच्यात दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती महेश तीर्थकुंडे विऊद्ध किसन यांच्यात सुमारे अर्धा तास रंगली होती. अखेर पंचांनी ही कुस्ती बरोबरीत सोडविली. पंच म्हणून रामा बिर्जे यांनी काम पाहिले.

Advertisement

तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती शंकर तीर्थकुंडे व पार्थ खादरवाडी यांच्यात झाली यामध्ये शंकर हे विजयी मिळविला.. चौथ्या क्रमांकाची कुस्ती महांतेश संतीबस्तवाड व विकासला याना चितपट केले. पाचव्या क्रमांकाची  कुस्ती अभिषेक संतीबस्तवाडने  रोहन मलतवाडीवर विजय पटकावून उपस्थितांची वाहवा मिळवली. गंगाराम, बसाप्पा खानापुरी, बसप्पा दरवेशी, आदींनी आखाड्यातील पंच म्हणून काम पाहिले. प्रारंभी आखाड्याचे पूजन देवस्थान पंचकमिटी व गावातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर गावातील लहान कुस्त्या झाल्या. ग्रामीण भागात लाल मातीच्या कुस्त्या टिकून राहाव्यात यासाठी या कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे असे पंच कमिटीच्या सदस्यांनी सांगितले. आखाडा यशस्वी करण्यासाठी देवस्थान कमिटीचे चनवीर पुजारी शिवाजी बसतवाडकर, सदाशिव चौगुले, पिराजी दरवेशी, कल्लाप्पा गुरव, गुंडू कांबळे आदींनी विशेष परिश्रम घेतले. या मैदानात प्रमुख कुस्त्या निकाली झाल्याने उपस्थित कुस्तीशौकिनांनी समाधान व्यक्त केले.

Advertisement
Tags :

.