For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्मयोगी डॉ. प्रभाकर कोरे

11:10 AM May 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
कर्मयोगी डॉ  प्रभाकर कोरे
Advertisement

आयुष्याची 40 मौल्यवान वर्षे केएलई संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित : केएलई संस्थेचे थोर शैक्षणिक संत, अष्टम ऋषी यांचा आज केएलई परिवारातर्फे सत्कार केएलईच्या प्रशासनाची 40 वर्षे पूर्ण करणारे केएलई संस्थेचे थोर शैक्षणिक संत, अष्टम ऋषी यांचा आज दि. 18 मे रोजी समस्त केएलई परिवारातर्फे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.त्या निमित्त...

Advertisement

‘सोलेंबा मातुंटे ई कऊमवीरनगे’ अर्थात हार माहीत नसलेला कर्मवीर या डॉ. मास्ती यांच्या शब्दपंक्ती डॉ. प्रभाकर कोरे यांना अक्षरश: लागू पडतात. डॉ. प्रभाकर कोरे यांनी आपल्या आयुष्याची 40 मौल्यवान वर्षे केएलई संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित केली आहेत. शून्यातून विश्वनिर्मिती केली आहे. त्यांच्या प्रशासनाचा कार्यकाळ हा केएलई संस्थेच्या इतिहासातील सुवर्णकाळ आहे. अनेक विक्रमांचा माइलस्टोन आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी सर्वोच्च कामगिरीचा डोंगर उभा केला आहे. आदर्श व्यवस्थापनाचा केएलई मॉडेल म्हणून नावारूपास आणलेले कर्मयोगी म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कर्मयोगी डॉ. कोरे यांनी लोकशाही मॉडेल अमलात आणून केएलई संस्थेचे सारथ्य अखंडपणे 40 वर्षे पूर्ण कार्यक्षमतेने केले आहे. 1916 मध्ये कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्थेची स्थापना करणाऱ्या सप्तर्षींचे स्वप्न साकार करणे ही त्यांची सर्वोच्च कामगिरी आहे. प्रतिकूल परिस्थितीतही नाउमेद न होता त्यांनी अप्रतिम कार्य केले आहे. त्यांचे कार्य आश्चर्यकारक आणि अद्भूत आहे. त्यांनी शेकडो आव्हाने स्वीकारून त्यावर सकारात्मक मार्ग काढला आहे. संस्थेच्या माध्यमातून ते जागतिक स्तरावरही कौतुकास पात्र ठरले आहेत. तसेच समाजासमोरही आदर्श ठेवला आहे केएलईच्या प्रशासनाची 40 वर्षे पूर्ण करणारे केएलई संस्थेचे थोर शैक्षणिक संत, अष्टम ऋषी यांचा आज समस्त केएलई परिवारातर्फे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी मंचावरील मान्यवरांचे, निमंत्रितांचे आणि या सोहळ्यासाठी आलेल्या केएलई संस्थेच्या संपूर्ण कुटुंबाचे स्वागत करून प्रार्थनेने या सोहळ्याची सुऊवात करूया. माननीय डॉ. प्रभाकर कोरे यांनी केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून 40 वर्षे दिलेले योगदान अद्वितीय आणि संस्मरणीय आहे. या प्रदीर्घ शैक्षणिक प्रवासात असंख्य टप्पे रचले गेले. त्यांच्या कार्याचा लेखाजोखा सर्वसमावेशकरित्या ग्रंथपुष्प ’रत्नराज’ यामध्ये मांडला गेला आहे. केएलई व्यवस्थापन मंडळाने प्रकाशित केलेले हे पुस्तक श्री. शामनूर शिवशंकरप्पा यांच्या हस्ते लोकार्पण व्हावे अशी विनंती आहे.

डॉ. प्रभाकर कोरे - एक आश्चर्य

Advertisement

कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवून बेळगावचे नाव जगाच्या नकाशावर कोरलेले डॉ. प्रभाकर कोरे हे अमेरिकेच्या थॉमस जाफरसन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळविलेले पहिले लिंगायत कन्नडीग होत. त्यांची अतुलनीय कामगिरी ध्यानात घेऊन आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवरील विद्यापीठे, सेवा संस्था, मठ-मंदिरांनी त्यांचा गौरव करून मानद डॉक्टरेट पदवी बहाल करून सन्मान केला आहे. 1984 ते 2024 हा कार्यकाल म्हणजे केएलईच्या इतिहासात अनेक विक्रम प्रस्थापित केलेला काळ आहे. 1984 मध्ये केएलई संस्था 38 संलग्न संस्था चालवित होती. आज ती संख्या 310 हून अधिक झाली आहे. त्यावेळी अंदाजे 9 कोटी रुपयांचे असलेले वार्षिक अंदाजपत्रक आज 3000 कोटीहून अधिक होऊन अग्रेसर आहे. त्यावेळी प्रामुख्याने जी. ए. हायस्कूल, लिंगराज कॉलेज आणि जे. एन. मेडिकल कॉलेज याद्वारे संस्थेची ओळख होती. आता एकट्या बेळगावातच 50 हून अधिक शाळा, महाविद्यालये, अद्ययावत भव्य हॉस्पिटल, विद्यापीठ, संशोधन संस्था, याद्वारे बेळगावचे नाव सर्वदूर पोहचविले आहे.

बेळगावात कन्नडची मुळे घट्टपणे रुजविण्यास कन्नडीगांचा बालेकिल्ला म्हणून निर्माण अविरत श्रम घेतलेले वीरभद्र डॉ. प्रभाकर कोरे हे आहेत. आमचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासह तत्कालिन बहुतांश सर्व राष्ट्रपती, पंतप्रधानांची केएलई संस्थेला भेट घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. संस्थापकांची स्मरणिका प्रकाशनासाठी प्रसिद्धी विभाग, संलग्न संस्थांना संस्थापकांचे नागकरण, कर्नाटक लिबरल शिक्षण संस्था असे असलेले नाव पुन्हा कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था असे फेर नामकरण केले. कॉलेज रोडचे नाव लिंगराज कॉलेज रोड म्हणून अधिकृत करून लिंगराज यांचा पुतळा प्रतिष्ठापीत केला. केएलई संस्थेचा 100 वर्षांचा इतिहास लिहून घेऊन केएलई वस्तू संग्रहालयाची स्थापना केली. एका पाठोपाठ एक अशी पीयु विज्ञान महाविद्यालये इंग्रजी माध्यमाच्या सी.बी.एस.ई. शाळा सुरू करण्याचे श्रेय डॉ. कोरे यांना जाते.

केएलई डीम्ड युनिव्हर्सिटी, केएलई

टॅक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, केएलई-युएसएम युनिव्हर्सिटी स्थापन करुन केएलईची किर्तीपताका जगभरात फडकविलेले साहसी डॉ. कोरे होत. देशाची राजधानी दिल्ली, कर्नाटकाची राजधानी बेंगळूर आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये म्हणजेच पुणे, मुंबई येथेही केएलईच्या संस्था अत्याधुनिकरित्या आणि आंतरराष्ट्रीय गुणवत्तेच्या धरतीवर काढण्यात त्यांची प्रतिभा, दूरदृष्टी आणि परिश्रम प्रशंसनीय आहे. सार्थक जीवनाचे साक्षी बनलेल्या डॉ. प्रभाकर कोरे यांना केएलईच्या संस्थापक सप्तवर्षीच्या पंक्तीत अष्टमऋषी म्हणून मोठ्या आदराने पात्र झाले आहेत. 2006 मध्ये त्यांच्यावर गोळीबार होऊनही चमत्कार घडवून ते जिवंत राहिले. पोटात बंदुकीची गोळी ठेऊनच 2006 पासून आतापर्यंत 18 वर्षे समचित्ताने तितक्याच ताकदीने प्रशासन देऊन मृत्युंजय म्हणून आपल्यामध्ये राहणे ही ईश्वराची कृपाच म्हणावी लागेल. वर्जाप्रमाणेच कठोर दिसत असले तरी त्यांचे हृदय फुलासारखे मृदू आहे. डॉ. कोरे यांनी केएलई संस्था मातेच्या ममत्वाने वाढविली आहे. तर पित्याच्या कर्तव्यनिष्ठूर भावनेतून दोषींवर कारवाई देखील केली आहे. कोणाला कोणत्या पदावर बसवावे, कोणाला कोणत्या पदासाठी पात्र ठरवावे याची जाण त्यांना आपला अनुभव, अद्भूत स्मरणशक्तीद्वारे शक्य होते. हे कौशल्य असलेले डॉ. प्रभाकर कोरे यांना आमच्या युगातील एक आश्चर्य म्हणावे लागेल. त्यांचे ऋण आम्हा सर्वांवर आहे. हे पांग फेडण्यासाठी ही शब्दपुष्पमाला, मी त्यांच्या गळ्यात घालण्याचा अभिमान बाळगतो.

- प्रा. बी. एस. गवीमठ, केएलई इतिहासकार, बेळगाव

प्रमुख पाहुण्यांबद्दल थोडेसे

  • डॉ. शामनूर शिवशंकरप्पा : देशाने पाहिलेला दुर्मीळ ज्येष्ठ राजकीय मुत्सद्दी. डॉ. शामनूर शिवशंकरप्पा यांनी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तसेच माजी मंत्री व दावणगेरे येथील विद्यमान आमदार या नात्याने वयाच्या 93 व्या वर्षी सक्रियपणे सेवा देत आहेत ही कौतुकास्पद बाब आहे. एक निष्पाप मनाचा लोकप्रिय आणि खंबीर नेता असल्याने ते तऊण पिढीसाठी आदर्श आहेत. त्यांची शिक्षणाची आवड प्रचंड आहे. बापूजी शिक्षण संस्थांचे मानद सचिव म्हणून वैद्यकीय, तांत्रिक शैक्षणिक संस्थांना अग्रेसर बनवले आहे. आजच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून शरण-संतांचे मार्ग अवलंबणारे डॉ. शामनूर शिवशंकरप्पा उपस्थित राहणार आहेत.
  • डॉ. वीरण्णा चरंतीमठ : माननीय डॉ. वीरण्णा चरंतीमठ यांनी 1991 मध्ये बागलकोटच्या श्री बसवेश्वर वीरशैव विद्यावर्धक संघाचे अध्यक्ष म्हणून धुरा स्वीकारून संस्थेची तुफान भरभराट केली. प्राथमिक शिक्षणापासून ते वैद्यकीय-तांत्रिक-अभियांत्रिकी शिक्षणापर्यंत 170 हून अधिक संलग्न संस्थांचे नेतृत्व करून शिक्षण क्षेत्रात त्यांनी अद्वितीय योगदान दिले आहे. बागलकोट मतदारसंघाचे माजी आमदार म्हणून त्यांनी तीन टर्ममध्ये ग्रामीण विकासासाठी अथक परिश्रम घेतले. ते आजही अनेक संस्थांना अध्यक्ष व सदस्य म्हणून मार्गदर्शन करत आहेत. साहित्य-कला-धर्म-संस्कृतीचे भक्त श्री. वीरण्णा चरंतीमठ हे मृदू, विनम्र आचरण असलेले कायकयोगी गृहस्थ आहेत.
  • श्री. शशील नमोशी : विधान परिषद सदस्य आणि हैदराबाद कर्नाटक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असलेले श्री. शशील नमोशी हे 46 शैक्षणिक संलग्न संस्थांचे नेतृत्व करत आहेत. कल्याण कर्नाटकातील पदवीपूर्व, पदवी, वैद्यकीय, तांत्रिक, अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थांद्वारे लाखो विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळून टाकले आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, एक धार्मिक व्यक्ती म्हणून, हैदराबादच्या कर्नाटक भागाच्या सांस्कृतिक क्षेत्रात दिलेले योगदान संस्मरणीय आहे.
  • श्री अल्लम गुऊबसवराज : शिक्षण प्रेमी म्हणून, श्री अल्लम गुऊबसवराज यांनी वीरशैव विद्यावर्धक संघाचे अध्यक्ष म्हणून अमूल्य सेवा दिली आहे.कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्यासोबत राहून मार्गदर्शक म्हणून आणि खांद्याला खांदा लावून प्रदीर्घ सेवा देणाऱ्या मान्यवरांचे दोन हृदयस्पर्शी शब्द.
Advertisement
Tags :

.