For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘नव्वद टक्के मतकेंद्रांवर गैरप्रकार’

06:37 AM May 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘नव्वद टक्के मतकेंद्रांवर गैरप्रकार’
Advertisement

हैद्राबादमधील 90 टक्के मतदानकेंद्रांवर गैरप्रकार झालेले आहेत, असा आरोप या मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार माधवी लता यांनी केला आहे. तेलंगणाची राजधानी असणाऱ्या मतदारसंघात सोमवारी मतदान पार पडले. लता यांनी अनेक मतदानकेंद्रांवर जाऊन परिस्थितीची पाहणी केली होती.

Advertisement

एका मतदानकेंद्रात त्यांनी मुस्लीम महिलांकडे ओळखपत्रांची मागणी केली. तसेच त्यांना चेहऱ्यावरील बुरखा हटविण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला. यासाठी त्यांच्या विरोधात तक्रारही सादर करण्यात आली आहे. हैद्राबादमध्ये बव्हंशी मतदानकेंद्रांमध्ये महिला पोलीस बुरखाधारी महिलांकडे त्यांची ओळखपत्रे मागत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे बनावट मतदान मोठ्या प्रमाणात झाल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, प्रशासनाने आरोप फेटाळला.

पोलिस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

Advertisement

बुरखाधारी मतदारांनी मतदान करण्यापूर्वी आपली ओळख सिद्ध केली पाहिजे. तसेच मतदान केंद्रावरील अधिकाऱ्याला आपला चेहरा दाखविला पाहिजे, असा नियम आहे. मात्र, पोलिस या नियमाकडे सरसकट दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले. आपण यासंबंधी पोलिस अधिकाऱ्यांना विचारले असता, ही आमची जबाबदारी नाही, असे उद्धट उत्तर मिळाल्याचा आरोपही त्यांनी केला.

ओवैसींशी लढत

या मतदारसंघात माधवी लता या एमआयएमचे खासदार असदुद्दिन ओवैसी यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आहेत. गेले दोन महिने त्यांनी येथे जोरदार प्रचार केला आहे. हा मतदारसंघ एमआयएमचा गढ मानला जातो. 1989 पासून सातत्याने येथे याच पक्षाचे उमेदवार विजयी होत आहेत. ओवैसी यांचा हैद्राबाद मतदारसंघात मोठा प्रभाव आहे.

Advertisement
Tags :

.