For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एसजीएफआय स्पर्धेसाठी बेळगावच्या नऊ खेळाडूंची निवड

10:19 AM Jan 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
एसजीएफआय स्पर्धेसाठी बेळगावच्या नऊ खेळाडूंची निवड
Advertisement

बेळगाव : लुधियाना, पंजाब येथे होणाऱ्या 67 व्या स्कूल गेम ऑफ फेडरेशनच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी 19 वर्षाखालील पदवीपूर्व कॉलेजच्या फुटबॉल स्पर्धेसाठी बेळगावच्या नऊ खेळाडूंची कर्नाटक संघात निवड झाली आहे. हा संघ लुधियानाला 6 रोजी रवाना होणार आहे. नुकत्याच बेंगळूर येथे झालेल्या राज्यस्तरीय पदवीपूव कॉलेज फुटबॉल स्पर्धेत बेळगाव जिल्ह्याच्या महिला फुटबॉलपटूंनी विजेतेपद पटकाविले. या विजेत्या संघातील नऊ महिला खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड झाली आहे. त्यामध्ये अर्पणा हरेर, रितू पाटील, अलिशा बोरजेस, मंजुशा पाटील (सर्व आरएलएस कॉलेज), दिशा डोंगरे, लक्ष्मी कांबळे (दोघीही लिंगराज कॉलेज), स्नेहा भेंडीगेरी (गोगटे कॉलेज), अनुष्का कटांबळे (जेएसएस कॉलेज), मानसी चरणकार  (केएलई इंडीपेंडन्ट कॉलेज) आदींचा समावेश आहे. वरील सर्व खेळाडू 6 ते 11 जानेवारी दरम्यान लुधियाना, पंजाब येथे होणाऱ्या एसजीएफआय राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी रवाना होणार आहेत. या सर्व खेळाडूंना  मानस नायक यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.