कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नैनितालमध्ये अपघातात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू

06:16 AM Nov 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नैनिताल

Advertisement

उत्तराखंडमधील नैनितालमध्ये अधौराहून हल्द्वानीकडे जाणाऱ्या एका वाहनाचा ताबा सुटून 500 फूट खोल दरीत कोसळल्याने मोठा अपघात झाला. वाहन दरीत कोसळल्याने नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अथक प्रयत्नांती स्थानिक लोकांनी दरीत तडफडत असलेल्या प्रवाशांना बाहेर काढून रस्त्यावर आणले. जखमींना उपचारासाठी हल्द्वानी येथील सुशीला तिवारी ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisement

नैनितालमध्ये शुक्रवारी पहाटे 5 वाजता एक वाहन 500 मीटर खोल दरीत कोसळल्याचे परिसरातील प्रकाश ऊवाली आणि रणजित मतियाली यांनी सांगितले. गाडीत एकूण 11 प्रवासी होते. वाहनातील प्रवाशांची जास्त संख्या आणि रस्त्याची खराब स्थिती ही या अपघाताची कारणे असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी नैनिताल रस्ता अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच गव्हर्नर लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग (निवृत्त) यांनीही वाहन अपघातातील मृतांबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article