For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Karad : कराडमध्ये रानडुक्कर शिकारप्रकरणात नऊ जणांना वनकोठडी

03:12 PM Nov 13, 2025 IST | NEETA POTDAR
karad   कराडमध्ये रानडुक्कर शिकारप्रकरणात नऊ जणांना वनकोठडी
Advertisement

                  वन विभागाची मोठी कामगिरी, सात जिवंत रानडुक्कर जप्त कराड 

Advertisement

कराड :  कराड  वन परिक्षेत्रांतर्गत कासारशिरंबे-बेलवडे रोडवर मंगळवारी पहाटेच्या सुमारास वन विभागाच्या रात्रगस्तीच्या पथकाने रानडुकरांची अवैध शिकार व वाहतूक करणाऱ्या टोळीला पकडून त्यांच्याकडून सात जिवंत रानडुक्कर व शिकारीचे साहित्य जप्त केले होते. याप्रकरणी वनविभागाच्या पथकाने नऊ जणांना ताब्यात घेतले होते.

त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना चार दिवसांची बनकोठडी सुनावली आहे. या प्रकरणी सोमनाथ बबन आडके, अमोल मारूती माने, सचिन हणमंत क्षीरसागर, सागर तानाजी यलमारे व अमित संजय आडके (सर्व रा. कासारशिरंबे, ता. कराड), गणेश नामदेव नंदीवाले (रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ), योगेश रघुनाथ कुंभार (रा. मानकापूर, ता. चिकोडी), अमोल गुंडाजी नंदीवाले (रा. कोथळे, ता. शिरोळ), दत्तात्रय धोंडीराम ढोणे (रा. पलूस, ता. पलूस) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

Advertisement

वन विभागाच्या माहितीनुसार, वनविभागाच्या रात्रगस्त घालणाऱ्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मंगळवारी पहाटे पाच बाजण्याच्या कासारशिरंबे-बेलवडे रस्त्यावर संशयित वाहनांची तपासणी केली असता त्या बाहनातून सात जिवंत रानडुक्कर, शिकारीसाठी वापरले जाणारे बाघर, गॅस साहित्य, पाळीव तीन शिकारी कुत्री तसेच विविध साहित्य जप्त करण्यात आले. चौकशीत बरील आरोपींनी ही रानडुक्करे राजेगाव व गव्हाणधडी, (ता. माजलगाव, जि. बीड) येथून आणल्याची कबुली दिली.

या आरोपींविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या कलम ९, ३९, ५०, ५१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.C ही कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव, बनक्षेत्रपाल ललिता पाटील, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल दिलीप कांबळे, आनंद जगताप, वनरक्षक दशरथ चिट्टे, अभिनंदन सावंत, कविता रासवे तसेच रेस्क्यू टीम सदस्य अजय महाडिक व रोहित कुलकर्णी यांच्या सहकार्याने करण्यात आली.

Advertisement
Tags :

.