परराज्यातील हायस्पीड ट्रॉलरची मालवणातील ट्रॉलरला जोरदार धडक
12:25 PM Jan 20, 2024 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
ट्रॉलरचे लाखोचे नुकसान : नऊ मच्छीमारांना वाचविण्यात यश
Advertisement
मालवण - :
Advertisement
कर्नाटक-मलपी येथील एका हायस्पीड ट्रॉलरने दिलेल्या जोरदार धडकेत मालवण येथील विश्वेश्वर प्रसाद या ट्रॉलरचे सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले. ट्रॉलरवरील नऊ मच्छीमारांना वाचविण्यात 'एकदंत' या दुसऱ्या ट्रॉलरवरील मच्छीमारांना यश आले. महतप्रयासाने पाण्याने भरलेला ट्रॉलर किनाऱ्यावर सकाळी १०.३० वाजता आणण्यात आला. शनिवारी मध्यरात्री १.१५ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी अज्ञात मलपी ट्रॉलरविरोधात ट्रॉलर मालक मोहन शिरसाट यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
Advertisement
Next Article