For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नऊ बांगलादेशींना मालपे येथे अटक

06:01 AM Oct 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
नऊ बांगलादेशींना मालपे येथे अटक
Advertisement

उडुपी पोलिसांची कारवाई : संशयितांकडे आढळले बनावट आधारकार्ड

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

देशातील विविध राज्यात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांना अटक करण्याची कारवाई सुरूच आहे. त्यानुसार उडुपी तालुक्यातील मालपे येथे गेल्या तीन वर्षांपासून बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या 9 बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. मच्छीमारी रोजगारासाठी आलेल्या बांगलादेशींना उडुपी पोलिसांनी मालपे वडबांडेश्वर बसस्थानकाजवळ अटक केली.

Advertisement

प्रथम मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मोहम्मद माणिक नावाच्या व्यक्तीने दुबईला जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बांगलादेशच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता तो बांगलादेशचा माणिक चौक राजशाही असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, त्याच्याकडे चौकशी केली असता मालपे येथे आणखी काहीजण असल्याची माहिती मिळाली. सध्या मालपे येथे हकीम अली, सुजॉन, इस्माईल, करीम, सलाराजकुल, मोहम्मद सोजीब, काजोल, उस्मान अशी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशींची नावे आहेत.

या आरोपींनी बनावट भारतीय कागदपत्रे तयार करून उडुपीमध्ये प्रवेश केला होता. संशयितांकडे बनावट आधारकार्ड सापडले आहे. सिक्कीममधील आगरतळा येथील काजोल याने बनावट आधारकार्ड बनवल्याची माहिती असून उस्मान याला बेकायदेशीररित्या आणून नोकरीची व्यवस्था केल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे. उडुपी पोलीस सध्या संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करत आहेत.

जिगनीमध्ये पाकिस्तानी नागरिकांना अटक केल्यानंतर पोलिसांची 4 पथके तयार करून पुढील तपासासाठी वेगवेगळ्या राज्यात पाठविण्यात आली होती. चेन्नई, दिल्ली आणि हैदराबाद येथे गेलेल्या पोलीस पथकाला मेहदी फाऊंडेशनशी संबंधित असलेल्या एकूण 22 जणांना अटक करण्यात यश आले. मेहदी फाऊंडेशनच्या भारताची जबाबदारी घेतलेल्या उत्तर प्रदेशस्थित परवेझ अहमद (वय 55) याने पाकिस्तानी नागरिकांच्या बेकायदेशीर वस्तीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तो पाकिस्तानी नागरिकांसाठी पासपोर्ट आणि आधारकार्ड कोणाकडून बनवत होता यासह अन्य मुद्यांवर सखोल चौकशी सुरू आहे.

Advertisement
Tags :

.