निना, फिनिक्स संघांची विजयी सलामी
कल्याणी चषक क्रिकेट स्पर्धा
या स्पर्धेत चार संघांना निमंत्रित करण्यात आले असून उद्घाटन सामन्यात निना अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 1 गडी बाद 231 धावा केल्या. त्यात कृष्णा पिसेने 13 चौकारांसह 90, अम्मारने 4 षटकार व 5 चौकारांसह 61 तर अफनाना बाळेकुंद्रीने 45 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना व्हीआयपीएस मुदोळ संघाचा डाव 19 षटकात 97 धावात आटोपला त्यात वैभव अष्टगीने 4 चौकारांसह 18 धावा केल्या. निनातर्फे अफनान, आर्यन, अमिन व यश यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात फिनिक्स अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी बाद 113 धावा केल्या. त्यात प्रेमकुमार कुरबरने 2 चौकारांसह 20 वेदांत हन्नीकेरीने 11 धावा केल्या. मुधोळतर्फे श्रीकांत व्ही. ने 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना मुधोळने 20 षटकात सर्व गडी बाद 91 धावा केल्या. फिनिक्सतर्फे वेदांत हन्नीकेरीने 9 धावात 4, अजय कात्रालने 4 धावात 3 गडी बाद केले.