For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निना, फिनिक्स संघांची विजयी सलामी

10:25 AM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
निना  फिनिक्स संघांची विजयी सलामी
Advertisement

कल्याणी चषक क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : बेळगाव ग्रामीण क्रिकेट अकादमी आयोजित कल्याणी चषक 12 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन दिवशी निना व फिनिक्स क्रिकेट अकादमी संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन विजयी सलामी दिली. कृष्णा पिसे (निना), वेदांत हन्नीकेरी (फिनिक्स) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. फिनिक्स स्कूलच्या मैदानावर आयोजित केलेल्या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महिला ज्येष्ठ खेळाडू श्रेया पोटे, पुरस्कर्ते भोमान्ना पोटे, देवेंद्र नाईक, माजिद मकानदार, महेश रे•ाr, महांतेश गवी, सुनील देसाई, राजू हन्नीकेरी आदी मान्यवरांच्या हस्ते यष्टीचे पूजन करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

या स्पर्धेत चार संघांना निमंत्रित करण्यात आले असून उद्घाटन सामन्यात निना अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 1 गडी बाद 231 धावा केल्या. त्यात कृष्णा पिसेने 13 चौकारांसह 90, अम्मारने 4 षटकार व 5 चौकारांसह 61 तर अफनाना बाळेकुंद्रीने 45 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना व्हीआयपीएस मुदोळ संघाचा डाव 19 षटकात 97 धावात आटोपला त्यात वैभव अष्टगीने 4 चौकारांसह 18 धावा केल्या. निनातर्फे अफनान, आर्यन, अमिन व यश यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात फिनिक्स अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी बाद 113 धावा केल्या. त्यात प्रेमकुमार कुरबरने 2 चौकारांसह 20 वेदांत हन्नीकेरीने 11 धावा केल्या. मुधोळतर्फे श्रीकांत व्ही. ने 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना मुधोळने 20 षटकात सर्व गडी बाद 91 धावा केल्या. फिनिक्सतर्फे वेदांत हन्नीकेरीने 9 धावात 4, अजय कात्रालने 4 धावात 3 गडी बाद केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.