महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बॉक्साईट रोडवरील ‘निलगिरी’वर चालविणार कुऱ्हाड

11:31 AM Jan 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तब्बल 1920 झाडांचा समावेश, जनतेला आक्षेप नोंदविण्याचे आवाहन

Advertisement

बेळगाव : महापालिका आयुक्तांच्या सूचनेवरून बॉक्साईट रोडच्या दोन्ही बाजूच्या हिंडलगा येथील सर्व्हे नं. 108 मधील 1920 निलगिरी झाडांवर कुऱ्हाड चालविली जाणार आहे. यासाठी मनपा आयुक्त शुभा बी. यांनी वनखात्याला पत्र पाठवून झाडे हटविण्याची सूचना केली आहे. बॉक्साईट रोडच्या उजव्या आणि डाव्या बाजूच्या जागेतील झाडे हटवून त्या ठिकाणी नवीन उद्यान निर्माण केले जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. शुभा बी. यांनी मनपा आयुक्त म्हणून सूत्रे स्वीकारताच कामाचा धडाका लावला आहे.  मालमत्ता कर वसुलीत हलगर्जीपणा दाखविणाऱ्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्याने त्यांच्या या निर्णयाची चर्चा मनपा वर्तुळात सुरू आहे. तसेच शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न चालविले आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्या महसुलात वाढ व्हावी यासाठी व्यवसाय परवाना न घेणाऱ्यांचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई सुरू ठेवली आहे.

Advertisement

मनपा आयुक्त शुभा बी. यांनी बेळगाव महानगरपालिकेच्या व्याप्तीत येणाऱ्या सह्याद्रीनगर स्कीम नं. 47 बॉक्साईट रोडच्या डाव्या आणि उजव्या बाजूला असलेल्या हिंडलगा सर्व्हे नं. 108 मधील 1920 निलगिरीची झाडे हटविण्यात यावीत, यासाठी वनखात्याला पत्रव्यवहार केला आहे. पण वनखात्याच्या 1976 नियम 8(3)(7) नुसार 50 हून अधिक झाडे तोडायची असल्यास त्याला जनतेतून आक्षेप मागविणे जरुरीचे आहे. त्यामुळे वनखात्याने सदर झाडांच्या संदर्भात 20 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता जनतेने लेखी स्वरुपात वनखात्याच्या कार्यालयात आक्षेप नोंदविण्याचे आवाहन केले आहे. नवीन उद्यान निर्मितीसाठी झाडे तोडली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मनपा आयुक्तांनी उद्यान निर्मितीसाठी उचललेले पाऊल स्वागतार्ह असले तरी यासाठी तब्बल 1920 झाडांची कत्तल केली जाणार असल्याने पर्यावरणप्रेमींतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

बॉक्साईट रोडच्या दोन्ही बाजूला उद्यान निर्मितीसाठी प्रयत्न 

बॉक्साईट रोडच्या दोन्ही बाजूला नवीन उद्यान निर्मितीसाठी महापालिका आयुक्तांनी प्रयत्न चालविल्याचे समजते. त्यामुळेच त्या ठिकाणची निलगिरीची झाडे तोडण्याची विनंती वनखात्याकडे करण्यात आली आहे. त्यानुसार जनतेतून आक्षेप मागविण्यात आले आहेत.

- विनय गौडर (साहाय्यक वनक्षेत्रपाल बेळगाव)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article