निलगार गणेशाचे 15 रोजी विसर्जन
10:59 AM Sep 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
संकेश्वर : सुमारे 14 दिवसापासून नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीच्या दर्शनाचा लाभ लाखो भाविकांनी घेतला आहे. दररोज भाविकांची गर्दी वाढत आहे. यंदा निलगार गणेशाचे 20 व्या दिवशी म्हणजे 15 रोजी येथील हिरण्यकेशी नदीत विसर्जन होणार आहे. 10 रोजी संकष्टी असल्यामुळे या दिवशी भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी होणार आहे. आजतागायत महाराष्ट्र, कर्नाटक व कोकणसह गोवा भागातील भाविक दर्शनाचा लाभ घेत आहेत. सुटीच्या दिवशी भाविकांची होणारी गर्दी लक्षवेधी ठरली आहे. भाविकांनी रांगेत राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Advertisement
Advertisement