निलेश राणेंच्या विजयाचा निर्धार जनतेनेच केला आहे
शिंदे गटाचे माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर यांची प्रतिक्रिया
मालवण । प्रतिनिधी
आजवर वाघाचे कातडे पांघरून वावरणाऱ्याला आता खरा जातिवंत वाघ भेटला आहे! आगे आगे देखो होता है क्या! कुडाळ मालवणचा विकास होण्याच्या जनतेच्या हक्कापासून आता कोणाचाही खोटारडेपणा आणि अफवांचा बाजार निलेश नारायण राणे या नावाला अडवू शकत नाही! आपली साथ थेट आणि २३ नोव्हेंबर २०२४, कोकणचा ढाण्या वाघ आमदार निलेश नारायणराव राणे विधानसभेत!! अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर यांनी विश्वास व्यक्त केला आहे.मांजरेकर पुढे म्हणाले आहेत की, निवडणूका येतात जातात.. काही चेहरे उगवतात मावळतात.. पण या सगळ्या राजकारणाच्या निमित्ताने काही चेहरे जनतेसमोर येतात, जे कायम जनतेच्या हृदयात जाऊन बसतात. त्यातलाच एक झळझळीत चेहरा आहे निलेश राणे! जे नाव नाही तर सर्वसामान्य जनतेचा ब्रँड म्हणून आज निवडणूकीत उतरले आहेत! "खोटं बोला पण रेटून बोला" याची मास्टरी उबाठा शिवसेनेकडे आहे, आणि विनायक राऊत, वैभव नाईक हे या स्कुलचे स्कॉलर आहेत. यापूर्वीच्या पहिल्या लोकसभा निवडणूक टर्ममध्ये या लोकांनी निलेश आणि नारायण राणेंना अशाच खोट्याची महापूजा घालत दोन्ही कोकण पुत्रांना विनाकारण प्रचंड बदनाम केले. पण खोट्याचे आयुष्य प्रभावी पण छोटे असते. आज घराघरात पोहोचलेल्या निलेशसाहेबांना जनता जेव्हा ओळखायला लागली, गैरसमजांचे आकाश मोकळे झाले आहे. जनतेने आपल्या हिमालयाएवढ्या चुकीला पुन्हा मजबूत दुरुस्तीत रूपांतर करायला सुरुवात केली आहे, आणि मागील निवडणुकीत विनायक राऊत यांची खासदारकी अस्सल कोकणी खोडरबर वापरत खोडून काढली आहे.
आली रे आली आता तुझी बारी आली! वैभव नाईक यांची आमदारकी जनता फक्त खोडून काढणार नाही, तर त्याच्या खुणाही पार पुसून टाकणार आहे. दहा वर्षात कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाला पन्नास वर्षे मागे नेणाऱ्या वैभव नाईक नावाच्या बिनकामी आमदाराचे नामोनिशाण पुसून टाकण्यासाठी जनता सज्ज आहे. विकास म्हणजे काय असतो, जनतेशी हृदयातले नाते कसे असते, वैभव नाईकांसारखी गोडबोली बनवेगिरी न करता जे पोटात तेच ओठात ठेवणारा एक सच्चा पारदर्शी माणूस कसा असतो आणि सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीसाठी निधी खेचून आणण्याची हिंमत आणि धमक कशी असते हे दाखवणारा नेता आज जनतेला मिळाला आहे, असेही मांजरेकर म्हणाले आहेत.