निलेश राणे बहुमताने विजयी होऊन विधानसभा गाजवतील !
मालवण गावभेट दौऱ्यात खा. नारायण राणे यांनी व्यक्त केला विश्वास
मालवण | प्रतिनिधी : महायुती सरकारने राज्यभरात कोट्यावधी रुपयांच्या निधीतून सर्वसामान्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या. युवक, शेतकरी, महिला, सर्वसामान्य नागरिक अशा सर्वांनाच विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे. यापुढेही विकासाचा हा ओघ राज्यात कायम राहील. महायुती सरकार पुन्हा येईल. कुडाळ मालवण मतदार संघात महायुतीचे उमेदवार निलेश राणे प्रचंड बहुमताने विजयी होऊन विधानसभा गाजवतील. असा विश्वास खा. नारायण राणे यांनी केले.
दरम्यान विरोधकांचा समाचारही खा. नारायण राणे यांनी आपल्या खास शैलीत घेतला. विरोधकांनी जिल्ह्यात बालवाडी तरी आणली काय? विकासात यांचे योगदान काय? या मतदारसंघात विकास ठप्प आहे. जनतेचे प्रश्न वाढत आहे. दहा वर्षे हा मतदारसंघ मागे गेला. असे खा. राणे म्हणाले. खा. नारायण राणे यांनी गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने मालवण तालुक्यातील नांदरुख साळकुंभा, आनंदव्हाळ, कुंभारमाठ, चौके, वायरी या गावांना सदिच्छा भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्याबाबत लवकरात लवकर उपाययोजना करण्याची ग्वाही दिली.
यावेळी महायुतीचे उमेदवार निलेश राणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, पुजा वेरलकर, दाजी सावजी, केदार झाड, पांडुरंग मायानक, अरुण तळगांवकर, शिवसेना पदाधिकारी राजा गावडे, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राज गावकर, महिला उपजिल्हाप्रमुख निलम राणे, माजी सचिव किसन मांजरेकर, युवासेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत, प्रितम गावडे, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर यांसह गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ तसेच महायुतीचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निलेश राणे विधानसभा गाजवणार
निलेश राणे यांना मत म्हणजे निश्चित महायुतीच्या विकासाला मत. त्यामुळे निलेश राणे मोठया मताधिक्याने विजयी होऊन विधानसभा गाजवणार. जनतेचा विश्वास सार्थकी ठरवणारा जनतेच्या हक्काचा आमदार ठरेलं. असा विश्वास खा. नारायण राणे यांनी व्यक्त केला.