महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अपघातात मयत झालेल्या वेरलकर यांच्या कुटुंबाला निलेश राणेंची आर्थिक मदत

05:08 PM Dec 03, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

बागायत प्रतिनिधी

Advertisement

ओरोस येथे काही दिवसापूर्वी झालेल्या मोटरसायकलच्या अपघातात उपचारादरम्यान मयत झालेल्या मालवण तालुक्यातील वेरळ गावातील दिनेश वेरलकर या ग्रामस्थांच्या राहत्या घरी जाऊन माजी खासदार निलेश राणे यांनी या कुटुंबाची भेट घेऊन या कुटुंबाला धीर दिला. तसेच या कुटुंबाला तातडीने रोख रुपयांची मदत देऊन दिनेश वेरलकर यांच्या आजारी मुलाच्या पुढील उपचारासाठी सर्व ते प्रयत्न करण्याचे यावेळी बोलताना माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले.

Advertisement

ज्या ज्या वेळी एखाद्या कुटुंबावरती प्रसंग ओढवतो तेव्हा माजी खासदार निलेश राणे हे धावून जातात. यावेळी सुद्धा निलेश राणे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत मृत पावलेल्या दिनेश वेरलकर या कुटुंबाला खऱ्या अर्थाने मानसिक आधार देऊन रोख रकमेची मदतही केली. यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, भाजप मालवण तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी जी प अध्यक्ष सरोज परब, महेश बागवे, वेरळ सरपंच धनंजय परब, माजी उपसभापती छोटू ठाकूर, संतोष पालव, पुरुषोत्तम शिंगरे, अनंत भोगले, बाळा मेस्त्री, महेश मांजरेकर, जितेंद्र परब, यशवंत हिंदळेकर, कैतान लोबो,शिवाजी परब, जगदीश चव्हाण, श्री सावंत, लवू वेतलकर, सदाशिव परब, श्री मुणगेकर, दत्ताराम परब, चेतन वेलकर, रघुनाथ परब, नामदेव परब, कालिदास वेरलकर, किरण पाटील, योगेश बागवे, भागेश परब,अनिल परब आणि वेरली ग्रामस्थ तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. माजी खासदार निलेश राणे यांचे वेरलकर परिवाराने ऋण व्यक्त केले.

 

Advertisement
Tags :
# tarun bharat news # nilesh rane
Next Article