महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निलेश राणे उद्या शिवबंधनात अडकणार

02:11 PM Oct 22, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर होणार सायंकाळी ४ वाजता सभा

Advertisement

कुडाळ / प्रतिनिधी
माझा शिवसेना प्रवेश निश्चित झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या सभेत आपण शिवसेनेत प्रवेश करणार असे माजी खासदार तथा भाजपा कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आपले वडील नारायण राणेंची राजकीय सुरुवात ज्या पक्षातून ज्या धनुष्यबाण चिन्हावर झाली त्याच चिन्हावर मला निवडणूक लढविण्याची संधी मिळत आहे याचे मला आनंद व समाधान आहे असे श्री राणे यांनी सांगून बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आपले प्रेम होते . आजही आपले प्रेम आहे. यापुढेही राहणार आहे असे सांगत निवडणूक जिंकायची हे आपले टार्गेट आहे आणि आणि टीमवर्क च्या जोरावर आम्हीही निवडणूक जिंकणार आहोत असा विश्वास श्री राणे यांनी व्यक्त केला येथील महालक्ष्मी हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत श्री राणे बोलत होते.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news # news update # konkan update # nilesh rane # kudal #
Next Article