महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

माजी खासदार निलेश राणेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज

02:22 PM Oct 28, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

या मातीचे ऋण विसरणार नाही ; जनता आपल्याला निवडून देईल ; निलेश राणेंचा विश्वास

Advertisement

कुडाळ । प्रतिनिधी

Advertisement

श्री निलेश राणे यांनी कुडाळ- मालवण विधानसभा मतदार संघातून शिवसेनेकडून महायुतीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज सोमवारी प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्याकडे अर्ज सादर केला . यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण ,खासदार नारायण राणे ,शिक्षणमंत्री दिपक केसरकर , आमदार नितेश राणे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, व भाजपा शिवसेना, महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्री राणे म्हणाले महायुतीचा उमेदवार म्हणून आपण आज अर्ज भरला आहे. कणकवली- देवगडचे आमदार नितेश राणे हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आम्ही त्यांच्या रॅलीला जाणार आहोत तेथे सभा होणार आहे. त्यामुळे आम्ही सभेला जाणार आहोत . शक्ती प्रदर्शन करण्याची गरज आम्हाला नाही. आमच्याबरोबर जनता आहे. आम्ही नेहमी सातत्याने त्यांच्या सोबत असतो असे सांगून महायुतीच्या नेत्यांचे त्यांनी आभार मानले . आजपर्यंत आपण लोकसभेचा फॉर्म भरत आलो आता विधानसभेचा फॉर्म भरण्याची संधी मला दिली आहे . मला जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत. जनतेची सेवा करायची आहे असे सांगत या मातीचे ऋण विसरणार नाही असे सांगितले. त्यांनी जनता आपल्याला निवडून देईल असा विश्वास व्यक्त केला.

आजपर्यंत आपण जनतेचा आदर सन्मान करत आलो आहे . त्यामुळे जनतेला माझे काम पटले तर जनता मला मोठ्या मताधिक्याने निवडून देईल असे सांगत आपण हे जनतेवरच सोडल्याचे त्यांनी सांगितले. कुडाळ -मालवणच्या लोकांची सेवा करण्याची संधी मला मिळावी असे आपण कुडाळेश्वरचरणी प्रार्थना केल्याचे श्री राणे यांनी सांगितले. श्री राणे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले नसले तरी शिवसेना ,भाजपा महायुतीचे पदाधिकारी नेते ,कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अकरा वाजता श्री राणे यांचे प्रांताधिकारी कार्यालयासमोर आगमन झाल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले . यावेळी सेना आणि भाजपाचे पदाधिकारी त्यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी निलेशजी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है .. अशा घोषणा दिल्या. त्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Advertisement
Tags :
# tarun bharat news # konkan update # news update# nilesh rane
Next Article