महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

निकिताने पूर्ण केले ‘ज्वेल थीफ’चे चित्रिकरण

06:00 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सैफ अली खानसोबत झळकणार

Advertisement

कबीर सिंह या चित्रपटामुळे चर्चेत आलेली निकिता दत्ता लवकरच ‘ज्वेल थीफ : द रेड सन’मध्ये दिसून येणार आहे. अभिनेत्रीने या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. यासंबंधीची माहिती तिनेच सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. निकिता मागील काही काळात अनेक चित्रपट तसेच वेबसीरिजमध्ये दिसून आल्याने तिचा चाहतावर्ग मोठा आहे.

Advertisement

तिने शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये ती निर्माती ममता आनंद आणि कुणाल कपूर तसेच सैफ अली खानसोबत दिसून येत आहे. या चित्रपटाची निर्मिती सिद्धार्थ आनंद आणि ममता आनंद हे स्वत:चा बॅनर मार्फ्लिक्स पिक्चर्स अंतर्गत करत आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन रॉबी ग्रेवाल करत आहे. चित्रपटात सैफ अली खान आणि जयदीप अहलावत मुख्य भूमिकेत आहेत.

निकिता दत्ता या चित्रपटात मुख्य नायिका म्हणून झळकणार आहे. निकिताला या चित्रपटाद्वारे स्वत:ची अभिनयक्षमता दाखवून देण्याची संधी मिळाली आहे. ज्वेल थीफ-द रेड सन हा चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे समजते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article