कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘नीट’मध्ये विजापूरचा निखिल सोन्नद राज्यात प्रथम, देशात 17 वा

06:10 AM Jun 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पहिल्या शंभरमध्ये कर्नाटकातील 7 विद्यार्थी

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

वैद्यकीय प्रवेशासाठी देशभरात पार पडलेल्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. विजापूरमधील निखिल सोन्नद याने राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे तर देशात त्याला 17 वा रँक मिळाला. विजापूरमधील डॉ. सिद्धप्पा सोन्नद आणि डॉ. मीनाक्षी सोन्नद या दाम्पत्याचे पुत्र असलेल्या निखिलला नीटमध्ये 720 पैकी 670 गुण मिळाले आहेत. मंगळूरमधील एक्स्पर्ट पदवीपूर्व महाविद्यालयाचा तो विद्यार्थी आहे. कर्नाटक सीईटीत त्याने अॅग्रीकल्चर विभागात उत्तम गुण मिळविले होते.

नीटसाठी कर्नाटकातून 1,47,782 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पहिल्या शंभर रँकमध्ये राज्यातील 7 विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले आहे. परीक्षेला राज्यातून एकूण 1,42,369 विद्यार्थी बसले होते. यातील 83,582 विद्यार्थ्यांनी पात्रता मिळविली आहे.

पहिल्या शंभरमध्ये राज्यातील विद्यार्थी

निखिल सोन्नद - 17 वा

सुचिर गुप्ता - 22 वा

तेजस घोटगलकर - 38 वा

प्रंशु जागीरदार- 42 वा

हरिणी श्रीराम - 72 वा

दिगंत एस. - 80 वार

निधी के. जी. - 84 वा

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article