‘नीट’मध्ये विजापूरचा निखिल सोन्नद राज्यात प्रथम, देशात 17 वा
पहिल्या शंभरमध्ये कर्नाटकातील 7 विद्यार्थी
प्रतिनिधी/ बेंगळूर
वैद्यकीय प्रवेशासाठी देशभरात पार पडलेल्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. विजापूरमधील निखिल सोन्नद याने राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे तर देशात त्याला 17 वा रँक मिळाला. विजापूरमधील डॉ. सिद्धप्पा सोन्नद आणि डॉ. मीनाक्षी सोन्नद या दाम्पत्याचे पुत्र असलेल्या निखिलला नीटमध्ये 720 पैकी 670 गुण मिळाले आहेत. मंगळूरमधील एक्स्पर्ट पदवीपूर्व महाविद्यालयाचा तो विद्यार्थी आहे. कर्नाटक सीईटीत त्याने अॅग्रीकल्चर विभागात उत्तम गुण मिळविले होते.
नीटसाठी कर्नाटकातून 1,47,782 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पहिल्या शंभर रँकमध्ये राज्यातील 7 विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले आहे. परीक्षेला राज्यातून एकूण 1,42,369 विद्यार्थी बसले होते. यातील 83,582 विद्यार्थ्यांनी पात्रता मिळविली आहे.
पहिल्या शंभरमध्ये राज्यातील विद्यार्थी
निखिल सोन्नद - 17 वा
सुचिर गुप्ता - 22 वा
तेजस घोटगलकर - 38 वा
प्रंशु जागीरदार- 42 वा
हरिणी श्रीराम - 72 वा
दिगंत एस. - 80 वार
निधी के. जी. - 84 वा