For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एसकेई प्लॅटिनम मैदानाला निखील भुसद यांची भेट

10:07 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
एसकेई प्लॅटिनम मैदानाला निखील भुसद यांची भेट
Advertisement

बेळगाव : एसकेई सोसायटीच्या प्लॅटिनम ज्युबली क्रिकेट मैदानाला शुक्रवारी धारवाड विभागीय क्रिकेट संघटनेचे समन्वयक निखील भुसद यांनी धावती भेट देऊन मैदानाची पाहणी करून मार्गदर्शन केले. यावेळी मैदानाची माहिती ज्येष्ठ क्रिकेटपटू समीर केशकामत व प्रशिक्षक विवेक पाटील यांनी दिली. खेळपट्टी व मैदानाची पाहणी करून मैदानाची तांत्रिकदृष्ट्या कशाप्रकारे करावे याचे मार्गदर्शन निखील भुसद यांनी केले. पुढील काळात या मैदानावर मोठे सामने भरविले जातील. यासाठी लागणारी सर्व तयारी लवकरात लवकर पूर्ण करावी. मैदान मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे या मैदानावर क्रिकेटप्रेमींची ओढ असून केएससीए मैदानानंतर या मैदानाची गरज कर्नाटक क्रिकेट संघटनेला लागणार आहे. त्यासाठी येत्या मोसमात मैदानाची तयारी करून घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला. या मैदानाचे चेअरमन आनंद सराफ यांनी निखील भुसद यांचे स्वागत करून भेटवस्तू देण्यात आली. या मैदानासाठी लागणारी मदत आपण करू, असे आश्वासनही भुसद यांनी यावेळी दिले.

Advertisement

Advertisement
Tags :

.