महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निगवे खालसा नृसिंह सरस्वती मंदिरास 2 कोटींचा निधी! माजी आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश

05:31 PM Sep 06, 2024 IST | Abhijeet Khandekar
MLA Amal Mahadik
Advertisement

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील निगवे खालसा गावात असलेल्या नृसिंह सरस्वती स्वामी मंदिरास शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास निधीतून तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. निधीसाठी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे माजी आमदार अमल महाडिक यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. निधीतून देवालयाच्या सुशोभीकरणासह विविध विकास कामे केली जाणार आहेत.

Advertisement

मंदिराच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यात चाळीस लाख रुपये निधी संबंधित विभागाकडे लवकरच वर्ग केला जाणार आहे. उर्वरित निधी टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सरस्वती देवालयाचा कायापालट होईल आणि धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर निगवे खालसा गाव अधिक ठळक होईल असा विश्वास यावेळी अमल महाडिक यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये असलेल्या ग्रामदेवतांच्या मंदिरांसाठीही निधी मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे महाडिक यांनी सांगितले. गावांमधील मंदिरे आध्यात्मिक आणि सामाजिक ऊर्जेची केंद्र असतात. त्यामुळे त्यांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन महाडिक यांनी दिले.

Advertisement

Advertisement
Tags :
MLA Amal MahadikNigwe Khalsa Nrisimha Saraswati Temple former MLA Amal Mahadik
Next Article