महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विशेष तंत्रज्ञानाद्वारे विमानाचे रात्री लँडिंग

07:00 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वायुदलाने जगाला दाखविले सामर्थ्य : नाइट व्हिजन गॉगल्सचा वापर

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

भारतीय वायुदलाने पूर्व क्षेत्रात एक मोठी कामगिरी करत रात्रीच्या वेळी सी-130जे विमानाला नाइट व्हिजन गॉगल्सच्या (एनव्हीजी) मदतीने उतरविले आहे. ही यशस्वी मोहीम वायुदलाच्या संरक्षण सज्जतेला आणखी मजबुती प्रदान करणार आहे. कुठल्याही अनपेक्षित स्थितीत वेगाने प्रत्युत्तर देण्यास यामुळे मदत मिळेल. ही पूर्ण मोहीम वायुदलाची रात्रीच्या वेळी मोहीम साकारण्याची क्षमता दर्शविते. वायुदलाने पहिल्यांदाच पूर्व क्षेत्रात एका अत्याधुनिक लँडिंग ग्राउंडवर नाइट व्हिजन गॉगल्सचा वापर करत एक विमान यशस्वीपणे लँड करविले. पूर्व क्षेत्रात ईशान्येतील राज्यांसमवेत ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल आणि बिहारचे काही हिस्से सामील आहेत. तेथे चीन, नेपाळ, भूतान, म्यानमार आणि बांगलादेशसोबत लागून 6300 किलोमीटरची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. वायुदलाने या यशस्वी कामगिरीची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिली. भारतीय वायुदलाकडून याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला. भारतीय वायुदल स्वत:च्या क्षमतांचा विस्तार करण्याचे सत्र कायम ठेवत राष्ट्रसुरक्षेसाठी स्वत:ची प्रतिबद्धता मजबूत करत असल्याचे व्हिडिओ शेअर करत म्हटले गेले आहे.

नाइट व्हिजन गॉगल्सचा वापर रात्रीच्या वेळी होणाऱ्या मोहिमांमध्ये वायुदलाला कमी प्रकाशातही अचूकपणे मोहीम पूर्ण करण्यास मदत करतो. यामुळे वायुदलाची रणनीतिक आघाडी मजबूत होते. याचबरोबर दुर्गम आणि सीमावर्ती क्षेत्रांमध्ये कुठल्याही आपत्कालीन स्थितीला त्वरित सामोरे जाण्यास वायुदलाला मदत मिळणार आहे. भारतीय वायुदलाला या तंत्रज्ञानामुळे खराब हवामानातही उ•ाण करण्यास मदत मिळेल. रात्रीच्या वेळी अवघड मोहिमेला याच्या माध्यमातून सोपे करता येणार आहे. एनव्हीजीच्या मदतीने आपत्कालीन स्थितीत सैनिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत रात्रीच्या वेळी पोहोचविले जाऊ शकते. पूर्व क्षेत्रात एनव्हीजी लँडिंगच्या यशामुळे भारत-चीन सीमेनजीक वायुदलाच्या रणनीतिक क्षमतांमध्ये वाढ झाली आहे. शत्रूला रात्रीच्या वेळी जलदपणे प्रत्युत्तर देता येणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article