महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नाईट क्लबचालकांचा स्थानिकांवर हल्ला

06:22 AM Dec 31, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हणजुणेतील प्रकाराने विरोधी पक्षनेते संतप्त

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

Advertisement

अनिर्बंध कर्णकर्कश संगीत वाजविल्यामुळे पोलिसात तक्रार करण्यासाठी गेलेल्या हणजुणे येथील स्थानिकांवर हल्ला करण्याचे धाडस क्लबचालकांना होणे हा प्रकार म्हणजे भाजप सरकारने पोलीस दल नाईट क्लबकडे गहाण ठेवले आहे याचा पुरावा आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे. क्लबचालकांच्या या दादागिरीचा त्यांनी तीव्र निषेध केला असून आपल्या आरोपावर पोलीस महासंचालकानी स्पष्टीकरण द्यावे तसेच सदर हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आलेमाव यांनी केली आहे.

वेळेच्या बंधनाबाहेर कर्णकर्कश संगीत वाजविल्यामुळे हणजुणे येथील रहिवाशांनी क्लबच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र त्याचा वचपा काढण्यासाठी क्लब चालकांनी त्या लोकांवर थेट हल्ला करण्याचे धाडस केले. सरकारी किंवा राजकीय पाठिंबा असल्याशिवाय असे धाडस होणे शक्य नाही. राज्यात बेकायदेशीर नाईट क्लब संस्कृतीला आश्रय दिल्याचा हा परिपाक आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेत्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

भाजपच्या आशीर्वादाने किनारी भागात आज सर्व प्रकारचे माफिया कार्यरत आहेत. त्यांची दादागिरी आणि उर्मटपणा दिवसेंदिवस वाढत असल्याने हे माफिया गोवा आणि गोमंतकीयांसाठी मोठा धोका ठरू लागले आहेत, असा आरोप आलेमाव यांनी केला आहे.

हा तर नाईट क्लबवाल्यांशी संगनमत असल्याचा पुरावा

अशा बेकायदेशीर क्लबवर कारवाई करण्यापासून अधिकाऱ्यांना कोण रोखते, असा सवाल उपस्थित करताना आलेमाव यांनी, कर्णकर्कश संगीताच्या विरोधात तक्रार करण्यासाठी स्थानिकांना पोलिसांकडे जावे लागते यावऊन कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांचे नाईट क्लबवाल्यांशी संगनमत असल्याचे उघड होते, असे म्हटले आहे.

’माफिया राज’ मुळे दर्जेदार पर्यटकांची गोव्याकडे पाठ

विदेशी पर्यटकांनी तर गोव्याकडे जशी काही पाठच फिरविली असल्याने  राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचे विपरित परिणाम आता समोर येऊ  लागले आहेत. राज्यात यंदा केवल 35 टक्के विदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे. ही संख्या घटण्यात व दर्जेदार पर्यटक गमावण्यास भाजपचे ‘माफिया राज’ कारणीभूत आहे, असे आलेमाव यांनी नमूद केले आहे. त्यामुळे महासंचालकांनी कोणत्याही राजकीय दबावाला न जुमानता कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे आवाहन आलेमाव यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article