महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जम्मू-काश्मीरमध्ये एनआयएचे छापे

06:22 AM Feb 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

टेरर फंडिंगप्रकरणी 10 ठिकाणी शोधमोहीम

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisement

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शनिवारी बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत जमात-ए-इस्लामी जम्मू काश्मीर या बेकायदेशीर संघटनेने दहशतवादी निधी पुरवल्याप्रकरणी काश्मीरमध्ये शनिवारी 10 ठिकाणी धाडसत्र टाकत मोठी कारवाई केली. दक्षिण काश्मीरसोबतच श्रीनगर आणि जम्मूमध्येही छापे टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यांच्या मदतीने छापे टाकण्यात आले. 28 फेब्रुवारी 2019 रोजी बेकायदेशीर संघटना घोषित केल्यानंतरही जमात-ए-इस्लामी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी फंडिंग क्रियाकलाप करत असल्याचे आढळून आले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article