कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दिल्ली स्फोटप्रकरणी एनआयएच्या धाडी

06:13 AM Dec 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेशमध्ये एकाच वेळी छापे

Advertisement

वृत्तसंस्था / श्रीनगर, लखनौ

Advertisement

गेल्या महिन्यात दिल्लीत करण्यात आलेल्या दहशतवादी कार स्फोटाचे धागेदोरे काश्मीरमध्ये असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकरणाने (एनआयए) या केंद्रशासित प्रदेशात 8 स्थानी एकाचवेळी धाडी घातल्या असून महत्वाची सामग्री हस्तगत केली आहे. या स्फोटप्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. अनेक दहशतवादी डॉक्टरांनी भारतात किमान 35 स्थानी मोठे स्फोट घडविण्याचे कारस्थान रचले होते, अशी माहिती एनआयएला मिळाली आहे. त्यामुळे या रॅकेटची पाळेमुळे उखडून काढण्यात येत आहेत. काश्मीरसोबतच उत्तर प्रदेशमध्ये लखनौ शहरात वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आल्याची माहितीही एनआयए पथकाकडून देण्यात आली. मात्र, याबाबत सविस्तर माहिती जारी करण्यात आली नाही.

सोमवारी पहाटेपासूनच हे धाडसत्र हाती घेण्यात आले होते. ते सोमवारी रात्रीपर्यंत चालू होते. दक्षिण काश्मीरमध्ये असलेल्या कुलगाम येथील डॉ. आदील अहमद राठेर, पुलवामा येथील डॉ. मुझम्मील शकील गनी आणि इतर संशयितांच्या घरांवर तसेच कार्यालयांवर धाडी घालण्यात आल्या. मुस्लीम धर्मगुरु मुफ्ती इरफान अहमद वागेय याच्या घरावरही शोपियान येथे छापा घालण्यात आला. पुलवामातील सांबुरा या खेड्यात राहणाऱ्या अमीर रशीद याच्या निवासस्थानावरही धाड पडली.

चारही जणांना अटक

धाडी टाकण्याआधीच या चारही जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीर पोलिसांनी ‘अन्सार गझवातुल हिंद’ या नावाने चालविण्यात येणारे दहशतवादी मॉड्यूल उध्वस्त केले होते. अटक करण्यात आलेल्या या चारही व्यक्ती या मॉड्यूलशी संबंधित आहेत, असा आरोप आहे.

महिला दहशतवादी सूत्रधार

लखनौ येथील डॉ. शाहीन शहीद नामक एक महिला डॉक्टर या मॉड्यूलची सूत्रधार असून तिलाही गेल्या महिन्यातच हरियाणातील फरीदाबाद येथून अटक करण्यात आली आहे. डॉ. आदील अहमद राठेर आणि डॉ. मुझ्झमील शकील गनी यांनाही फरीदाबाद येथूनच अटक करण्यात आली. नंतर या स्फोटाचा तपास एनआयएने आपल्या हाती घेतल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी या आरोपींना एनआयएच्या आधीन केले. एनआयएनेही सहा जणांना अटक केली असून त्यांची नावे अनुक्रमे अमीर, मुफ्ती, इरफान आणि जसीर बिलाल अशी आहेत. बिलाल हा डॉ, आदील राठेर यांचा शेजारी आणि सहकारी आहे. आदील राठेर यांनेच हा स्फोट घडवून आणला होता. त्यात त्याचाही अंत झाला होता, अशी माहिती आहे.

सोमवारच्या धाडींची कारणे

दिल्ली स्फोटाच्या संदर्भातील आणखी पुरावे शोधण्यासाठी, तसेच डिजिटल सामग्री हस्तगत करण्यासाठी सोमवारच्या धाडसत्राचे आयोजन केले गेले होते. एनआयएच्या हाती मोठ्या प्रमाणात सामग्री लागली असून त्यामुळे या दहशतवाद्यांच्या विरोधातील अभियोग अधिकच भक्कम होणार आहे. आगामी काही दिवसांमध्ये आणखी अनेक धाडी घालण्यात येण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानातही धागेदोरे

दिल्ली स्फोटाच्या कारस्थानाचे धागेदोरे पाकिस्तातही आहेत, अशी माहिती एनआयएला मिळाली आहे. जम्मू-काश्मीरच्या डॉक्टरांच्या मॉड्यूलची स्थापना पाकिस्तानच्याच सक्रीय सहभागाने झाली होती. पाकिस्तानी दहशतवादी भारतात पाठवून त्यांच्याकडून हिंसाचार घडविण्यापेक्षा भारतातच मोठ्या प्रमाणात दहशतवादी तयार करुन त्यांच्याकरवी रक्तपात घडविल्यास पाकिस्तानवर दोष येणार नाही, अशी त्या देशाची अटकळ आहे. त्यामुळे भारतातील उच्चशिक्षित मुस्लीम तरुणांना हाताशी धरुन त्यांना दहशतवादी बनविण्याचे हे पाकिस्तानचे कारस्थान आहे, अशीही माहिती गुप्तचरांना उपलब्ध झाली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी हे मॉड्यूल वेळीच उद्ध्वस्त केल्याने आणि 3,000 किलो स्फोटके ताब्यात घेतल्याने भारतात मोठा अनर्थ टळला आहे, अशीही माहिती दिली गेली.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article