महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

छत्तीसगडमध्ये 6 ठिकाणी एनआयएचे छापे

06:36 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रोख रक्कम, आक्षेपार्ह सामग्री हस्तगत

Advertisement

वृत्तसंस्था/ रायपूर

Advertisement

एनआयएने छत्तीसगडमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईदरम्यान 2.98 लाख रुपये आणि आक्षेपार्ह सामग्री जप्त करण्यात आल्याची माहिती एनआयएने शुक्रवारी दिली. मागील वर्षी विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदान कर्मचाऱ्यांच्या पथकाला लक्ष्य करत नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

एनआयएने छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यातील बडेगोबरा गावातील नक्षलग्रस्त भागात 6 संशयितांच्या ठिकाणांवर छापे टाकले. प्रतिबंधित नक्षली संघटनेच्या मैनपूर-नुआपाडा विभागाचे समर्थक आणि ओव्हरग्राउंड वर्करच्या स्वरुपात काम करणाऱ्या संशयितांच्या ठिकाणी घेतलेल्या झडतीदरम्यान 2,98,000 रुपयांची रोख  रक्कम आणि अनेक मोबाइल सापडले आहेत.

नोव्हेंबर 2023 मध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या स्फोटात आयटीबीपीचा एक जवान जखमी झाला होता. फेब्रुवारी 2024 मध्ये एनआयएने या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. तपासादरम्यान एनआयएने हल्ल्याचे गुन्हेगार म्हणून नक्षलवाद्यांची ओळख पटविली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article