For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

4 राज्यांमध्ये 30 ठिकाणी एनआयएचे छापे; खलिस्तानी दहशतवादी- गँगस्टर कनेक्शनप्रकरणी कारवाई

06:10 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
4 राज्यांमध्ये 30 ठिकाणी एनआयएचे छापे  खलिस्तानी दहशतवादी  गँगस्टर कनेक्शनप्रकरणी कारवाई
Advertisement

Advertisement

वृत्तसंस्था/ चंदीगड

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मंगळवारी पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश आणि चंदीगडमधील 30 ठिकाणी छापे टाकले आहेत. एनआयएकडून खलिस्तानी दहशतवादी-गँगस्टर प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. याचबरोबर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्यासारख्या गँगस्टर्ससोबत संबंध बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर एनआयएकडून कारवाई करण्यात येत आहे.

Advertisement

एनआयएचे पथक मंगळवारी पहाटेच विविध राज्यांच्या पोलिसांसोबत संशयितांच्या ठिकाणांवर पोहोचले होते. मध्यप्रदेशच्या भोपाळ आणि पंजाबच्या फरिदकोटमध्ये पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली आहे. या संशयितांचे विदेशात लपून बसलेल्या गँगस्टर्सशी कनेक्शन असल्याचा एनआयएला संशय आहे.

फरिदकोच्या कोटकपुरामध्ये नरेश कुमार उर्फ गोल्डीच्या घरी एनआयएने छापे टाकले आहेत. गँगस्टर गोल्डीच्या नातेवाईकाकडून प्राप्त दस्तऐवजांच्या आधारावर ही कारवाई केली आहे. याचबरोबर मोगाच्या बिलासपूर गावातही पथकाने एका युवकाची चौकशी केली आहे.

राजस्थानच्या 4 जिल्ह्यांमधील 10 ठिकाणी एनआयएने झडती घेतली आहे. हरियाणात एका उद्योजकाच्या हत्येनंतर आरोपींच्या झालेल्या चौकशीच्या आधारावर जोधपूर, चूरू, झुंझुनूं आणि बिकानेरमध्ये एनआयएने छापे टाकले आहेत. या जिल्ह्यांमध्ये लॉरेन्स टोळीच्या हस्तकांनी स्वत:चे अ•s निर्माण केल्याचा इनपूट एनआयएला मिळाला आहे.

युवकाला घेतले ताब्यात

मध्यप्रदेशच्या तीन जिल्ह्यांमध्ये एनआयएने छापे टाकले आहेत. पथकाने भोपाळच्या खानूगावातून एका युवकाला ताब्यात घेतले आहे. हा युवक खलिस्तानी दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा इनपूट मिळाला होता. याचबरोबर खंडवा आणि बडवानीमध्ये देखील एनआयएकडून कारवाई करण्यात आली आहे

Advertisement
Tags :

.