डॉ. आंबेडकर यांच्यामुळेच आज दलितांमध्ये आत्मविश्वास, लवकरच इंदूमिल स्मारक पूर्ण होईल, मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन
dr.babasahebambedkar- भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आज 66 वा महापरिनिर्वाण दिन आहे. मुंबईच्या चैत्यभूमीवर आज जनसागर उसळला आहे. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वपूर्ण घोषणा केली.
'इंदू मिल स्मारकाबाबत बोलताना,इंदू मिलमधील स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल. आम्ही आढावा घेत पाहणी केली आहे. बाबासाहेब यांचा आठवणी जपण्याचा काम केलं जाईल. राजगृहवरील ऐतिहासिक ठेवा सुद्धा जपला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. इंदू मिलमधील आंतरराष्ट्रीय स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल.अशी ग्वाही दिली.'
'माझ्यासारख्या सर्व सामान्य कुटुंबातील नागरिक आज मुख्यमंत्री झाला हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे घडलं. दलित समाजात रुजलेली न्यूनगंडाची भावना बाबासाहेबांननी काढून टाकली. दलित बांधवांमध्ये जो आत्मविशास निर्माण झाला, त्याचं श्रेय डॉ. आंबडेकरांना जातं.' असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.