महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

न्यूझीलंडचा इंग्लंडवर तीन धावांनी रोमांचक विजय

06:40 AM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

टी-20 महिलांची मालिका : सोफी डिव्हाइन सामनावीर

Advertisement

वृत्तसंस्था/ नेल्सन

Advertisement

यजमान न्यूझीलंड आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघामध्ये सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडने तिसऱ्या सामन्यात इंग्लंडचा केवळ 3 धावांनी पराभव केला. या विजयामुळे न्यूझीलंडने इंग्लंडची आघाडी थोडी कमी केली. इंग्लंडने या मालिकेतील पहिले सलग दोन सामने जिंकून 2-1 अशी आघाडी मिळविली आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यत न्यूझीलंडच्या सोफी डिव्हाइनला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.

या तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 155 धावा जमविल्या. त्यानंतर इंग्लंडने 20 षटकात 8 बाद 152 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला.

न्यूझीलंडच्या डावामध्ये कर्णधार सोफी डिव्हाइनने 37 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 60, अॅमेलिया केरने 35 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 44, बेझूडेनहॉटने 27 चेंडूत 5 चौकारांसह 34, तसेच बेट्सने 20 चेंडूत 1 चौकारासह 14 धावा झळकाविल्या. न्यूझीलंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 40 धावा जमविल्या. न्यूझीलंडचे अर्धशतक 44 चेंडूत, शतक 90 चेंडूत तर दीडशतक 114 चेंडूत फलकावर लागले. डिव्हाइनने 30 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह अर्धशतक झळकाविले. अॅमेलिया केर आणि डिव्हाइन यांनी तिसऱ्या गड्यासाठी 99 धावांची भागिदारी केली. न्यूझीलंडच्या डावात 2 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे गिब्सनने 2 तर ग्लेनने 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावात माईया बाऊचरने एकाकी लढत देत 47 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांसह 71 धावा तर सलामीच्या ब्यूमाँटने 34 चेंडूत 5 चौकारांसह 37 धावा जमविल्या. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 10 षटकात 92 धावांची भागिदारी केली. कर्णधार नाईटने 10 तर गिब्सनने 10 धावा जमविल्या. इंग्लंडच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. इंग्लंडला अवांतराच्या रुपात 13 धावा मिळाल्या. इंग्लंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 60 धावा जमविताना 1 गडी गमविला. इंग्लंडचे अर्धशतक 33 चेंडूत, शतक 72 चेंडूत तर दीडशतक 118 चेंडूत फलकावर लागले. बाऊचरने 33 चेंडूत 9 चौकारांसह अर्धशतक झळकाविले. न्यूझीलंडतर्फे सोफी डिव्हाइन, बेट्स यांनी प्रत्येकी 2 तर रो आणि अॅमेलिया केर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. इंग्लंडच्या डावात 1 षटकार आणि 7 चौकार नोंदविले गेले.

संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड 20 षटकात 3 बाद 155 (सोफी डिव्हाइन 60, बेट्स 14, बेजूडेनहॉट 34, अॅमेलिया केर 44, ग्रीन नाबाद 1, अवांतर 2, गिब्सन 2-22, ग्लेन 1-8), इंग्लंड 20 षटकात 8 बाद 152 (बाऊचर 71, ब्यूमाँट 37, गिब्सन नाबाद 10, नाईट 10, अवांतर 13, डिव्हाइन 2-23, बेट्स 2-4, रो 1-20, केर 1-29).

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article