For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा तगडा प्लॅन

06:00 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा तगडा प्लॅन
Advertisement

गोलंदाजी प्रशिक्षकपदी जेकब ओरमची नियुक्ती : कसोटी मालिकेसाठी तगडा संघ उतरवणार असल्याचे संकेत

Advertisement

वृत्तसंस्था/ऑकलंड

भारत दौऱ्यापूर्वी माजी अष्टपैलू जेकब ओरमची न्यूझीलंडच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ओरम शेन जर्गेनसेनची जागा घेईल, जर्गेनसेन नोव्हेंबर 2024 मध्ये पायउतार होणार आहे. ओरम 7 ऑक्टोबर रोजी अधिकृतपणे रुजू होणार आहेत. किवी संघ 16 ऑक्टोबरपासून टीम इंडियाविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेदरम्यान ओरमला बेन सियर्स आणि विल ओ‘रुर्क यांसारख्या नव्या चेहऱ्यासोबत काम करावे लागणार आहे. दरम्यान, ओरमची नियुक्ती करत किवीज संघाने आगामी कसोटी मालिकेसाठी सर्व तयारीनिशी उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Advertisement

जैकब ओरम म्हणाला, ब्लॅककॅप्सशी पुन्हा एकदा जोडले जाण्याची संधी मिळाल्याने मला आनंद होत आहे. माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या संघाशी पुन्हा जोडले जाणे ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजीमध्ये नवीन प्रतिभा उदयास येत आहे आणि मला आशा आहे की, मी माझे ज्ञान आणि अनुभव त्यांच्याशी शेअर करू शकेन, जेणेकरून ते त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या आव्हानांसाठी उत्तम प्रकारे तयार करू शकतील. विशेष म्हणजे, ओरम बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेतही संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक होता. तसेच अलीकडेच झालेल्या टी-20 विश्वचषकात संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक होता. दरम्यान, ओरमला 10 वर्षांचा कोचिंगचा अनुभव आहे. 2014 मध्ये त्याने न्यूझीलंड अ संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. तेव्हापासून तो प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

Advertisement
Tags :

.