कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

न्यूझीलंडचा संघ जाहीर

06:22 AM Nov 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ ऑकलंड

Advertisement

येत्या बुधवारपासून सुरु होणाऱ्या विंडीज विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली असून काईल जेमिसन आणि फिरकी गोलंदाज सोधी यांचे पुनरागमन झाले आहे. न्यूझीलंडच्या या संघामध्ये नाथन स्मिथ हा एकमेव नवा चेहरा आहे.

Advertisement

या मालिकेसाठी 14 जणांचा न्यूझीलंड संघ घोषित करण्यात आला. मिचेल सँटनरकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेनंतर सोधीचे न्यूझीलंड संघात पुनरागमन होत आहे. केन विल्यम्सनने टी-20 प्रकारातून नुकतीच निवृत्तीची घोषणा केल्याने त्याचा या मालिकेसाठी विचार करण्यात आला नाही. न्यूझीलंड टी-20 संघ - सँटनर (कर्णधार), ब्रेसवेल, चॅपमन, कॉन्वे, डफी, फोक्स, जेमिसन, मिचेल, नीशम, रचिन रवींद्र, रॉबिन्सन, सिफर्ट, नाथन स्मिथ आणि सोधी.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article