वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा
वृत्तसंस्था / वेलिंग्टन
सध्या विंडीजचा क्रिकेट संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आला आहे. आता न्यूझीलंड आणि विंडीज यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 16 नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. मात्र माजी कर्णधार केन विलियम्सनला ही वनडे मालिका हुकणार आहे तर मॅट हेन्रीचे पुनरागमन झाले आहे.
या महिन्याच्या प्रारंभी केन विलियम्सनने टी-20 प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली होती. आता विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी विलियम्सनला न्यूझीलंडच्या निवड समितीने वगळले आहे. या वनडे मालिकेतील पहिला सामना ख्राईस्टचर्च येथे 16 नोव्हेंबरपासून सुरू होईल. उभय संघातील पहिला वनडे सामना 16 नोव्हेंबरला ख्राईस्टचर्च येथे, दुसरा सामना 19 नोव्हेंबरला नेपियर येथे तर तिसरा आणि शेवटचा वनडे सामना 22 नोव्हेंबरला हॅमिल्टनमध्ये होणार आहे.
न्यूझीलंड वनडे संघ : मिचेल सँटनर (कर्णधार), ब्रेसवेल, चॅपमन, कॉन्वे, डफी, फोक्स, रचिन रवींद्र, मॅट हेन्री, जेमिसन, लॅथम, डॅरियल मिचेल, नाथन स्मिथ, टिकनर व विल यंग यांचा समावेश आहे.