कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

न्यूझीलंडला 96 धावांची आघाडी, डफीचे 5 बळी

06:54 AM Dec 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च, न्यूझीलंड

Advertisement

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडिज 96 धावांनी पिछाडीवर पडला आहे. शाई होपने बुधवारी डोळ्यांच्या संसर्गामुळे चष्मा घालून फलंदाजी करताना पहिले कसोटी अर्धशतक पूर्ण केले. वेस्ट इंडिजचा पहिला डाव 167 धावांवर संपला आणि न्यूझीलंडने खेळ थांबवण्यापूर्वी सात षटकांत बिनबाद 32 धावा केल्या होत्या.

Advertisement

निराशाजनक परिस्थितीत होपने हेल्मेटखाली मोठा परावर्तक चष्मा घातलेला पाहणे कदाचित विचित्र वाटले असले, तरी सुऊवातीचे दोन फलंदाज गमावल्यानंतर त्याच्या 56 धावांच्या खेळीने वेस्ट इंडिजचा पहिला डाव स्थिरावला. दुसऱ्या टोकाला टॅगेनरिन चंद्रपॉलने 165 चेंडूंत अर्धशतक झळकावताना भरपूर मेहनत घेतली. या जोडीच्या 90 धावांच्या भागीदारीमुळे पहिल्या डाव 231 धावांवर संपलेल्या न्यूझीलंडच्या जवळ पोहोचण्यास वेस्ट इंडिजला मदत झाली.

वेस्ट इंडीजची धावसंख्या 6 बाद 157 असताना आलेल्या पावसामुळे खेळाडूंना मैदानाबाहेर पडावे लागले. जेव्हा ते परतले तेव्हा विंडीजच्या फलंदाजांना मंदावणाऱ्या प्रकाशात न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांचा सामना करावा लागला आणि शेवटचे चार फलंदाज अवघ्या 10 धावांत परतले. जेकब डफीने चारही बळी घेतले आणि 34 धावांत 5 बळी अशी त्याची कामगिरी राहिली. ही त्याची कसोटीत पाच बळी मिळविण्याची पहिलीच खेप आहे. त्यानंतर न्यूझीलंडला पुन्हा काळोख्या आकाशाखाली फलंदाजी करावी लागली. मात्र त्यांनी एकही गडी न गमावता 32 धावा काढल्या. त्यात टॉम लॅथम 14 धावांवर, तर डेव्हॉन कॉनवे 15 धावांसह नाबाद आहे.

या दिवशी गोलंदाज फलंदाजांना चकवत राहिले. यावरून होप आणि चंद्रपॉल यांच्या कामगिरीचे महत्त्व कळून चुकते. धावा काढण्यासाठी सर्वांनाच संघर्ष करावा लागला आणि गोलंदाजांनी फलंदाजाच्या तंत्राची कसोटी पाहिली. मॅट हेन्रीने ऑफ स्टंपभोवती सतत मारा केला आणि दबाव आणताना वेगवान आणि अचूक गोलंदाजी केली. त्याने एकाच षटकात अॅलिक अथेनाझ (4), त्यानंतर रोस्टन चेस आणि जस्टिन ग्रीव्हज यांना शून्यावर बाद केले. त्याने 39 धावांत 3 बळी टिपले.

तत्पूर्वी बुधवारी सकाळी न्यूझीलंडचा डाव 9 बाद 231 वरून सुरू झाल्यानंतर त्याच धावसंख्येवर संपुष्टात येऊन झॅक फॉल्क्स हा बाद होणारा शेवटचा फलंदाज ठरला. त्यानंतर त्याने जॉन कॅम्पबेलला (1) सामन्यातील त्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद केले आणि न्यूझीलंडतर्फे कसोटीतील आपल्या पहिल्या बळीची नोंद केली.

संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड पहिला डाव सर्व बाद 231, वेस्ट इंडिज पहिला डाव सर्व बाद 167 (टी. चंद्रपॉल 52, शाई होप 56 धावा, मॅट हेन्री 3-43, झाकारी फॉल्क्स 2-32, जेकब डफी 5-34), न्यूझीलंड दुसरा डाव बिनबाद 32 (टॉम लॅथम नाबाद 14, डेव्हॉन कॉनवे नाबाद 15).

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article