कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पहलगाम हल्ल्याच्या वृत्तांकनावर न्यूयॉर्क टाइम्सला फटकार

06:09 AM Jul 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अमेरिकेच्या विदेश विषयक समितीने दाखविला आरसा

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

Advertisement

अमेरिकेच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या विदेश विषयक समितीने पहलगाम हल्लयानंतर पाकिस्तानात सक्रीय लष्कर-ए-तोयबाची मुखवटा संघटना द रेजिस्टेंस फ्रंटला जागतिक दहशतवादी संघटना घोषित करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. नागरिकांची हत्या करणाऱ्या कुणालाही मोकळे सोडले जाणार नाही असे समितीने म्हटले आहे. तसेच समितीने अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सला फटकारत पहलगाम हल्ल्याचे योग्य वृत्तांकन न केल्याचा ठपका ठेवला आहे.

भारत असो किंवा इस्रायलसंबंधी जेव्हा दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा येतो, तेव्हा न्यूयॉर्क टाइम्स वस्तुस्थितीपासून नजर हटविते अशी टिप्पणी विदेश विषयक प्रतिनिधी सभेच्या समितीचे अध्यक्ष ब्रायन मास्ट यांनी केली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर न्यूयॉर्क टाइम्सने ‘काश्मीरमध्ये उग्रवाद्यांनी कमीतकमी 24 पर्यटकांवर गोळ्या झाडल्या’ या शीर्षकासह वृत्त प्रकाशित केले होते. न्यूयॉर्क टाइम्सने या वृत्तात दहशतवाद्यांच्या जागी उग्रवादी हा शब्द वापरत पहलगाम हल्ल्याच्या गुन्ह्याची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे.

अमेरिकेने मागील आठवड्यात द रेजिस्टेंस फ्रंटला विदेशी दहशतवादी संघटना (एफटीओ) घोषित केले होते. द रेजिस्टेंस फ्रंट एक विदेशी दहशतवादी संघटना आहे. पहलगाम येथे द रेजिस्टेंस फ्रंटने केलेला हल्ला हा स्पष्टपणे दहशतवादी हल्ला होता असे मास्ट यांनी नमूद केले आहे.

अमेरिकेने द रेजिस्टेंस फ्रंटला दहशतवादी संघटना घोषित केल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेकडून अशाप्रकारचे पाऊल उचलले जाणार नसल्याचे पाकिस्तानचे मानणे होते. परंतु ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानच्या विनंतीला सुरुंग लावत हे पाऊल उचलले आहे. तर दुसरीकडे अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारताच्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय स्तरावर बळ मिळाले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article