For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तरुणाईला नववर्षाचे वेध

06:25 AM Dec 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
तरुणाईला नववर्षाचे वेध
Advertisement

ओल्डमॅनची प्रतिकृती साकारण्याची घाई

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

वर्षअखेर जवळ आला की तऊणाईला वेध लागतात ते नववर्षाच्या स्वागताचे. आयुष्यातील जुन्या कटू आठवणी मागे सोडून नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठीची तयारी केली जाते. जुन्या आठवणी यावषीच सोडून जाण्यासाठी ओल्डमॅन तयार केला जातो. बेळगावमध्ये भव्य दिव्य ओल्डमॅन तयार करण्याची पद्धत आहे. सध्या काहीच दिवस शिल्लक राहिल्याने बाल तऊणाई ओल्डमॅन तयार करण्याच्या तयारीला लागली आहे.

Advertisement

कागद, प्लास्टिक, चिंध्या, कापड यांचा वापर करून ओल्डमॅन तयार केला जातो. बेळगावमध्ये पाच फुटांपासून 25-30 फुटांपर्यंत ओल्डमॅन तयार केले जातात. यावषीही ओल्डमॅन तयार करण्यासाठी तऊणाईची लगबग सुरू  आहे. विशेषत: पॅम्प भागामध्ये ओल्डमॅन तयार केले जात आहेत. काहीजण आवड म्हणून तर काहीजण व्यवसाय म्हणून ओल्डमॅन तयार करत आहेत.ओल्डमॅनसोबतच विविध आकारातील ओल्डमॅनचे मुखवटे विक्रीस दाखल झाले आहेत. नाताळपासून ओल्डमॅनच्या तयारीला वेग आला आहे.

सलग सुट्यांमुळे ओल्डमॅन तयार करण्यास तऊणाईला वेळ मिळाला. सध्या ओल्डमॅन विक्री जोमात सुरू आहे. पाचशे ऊपयांपासून पाच हजार ऊपयांपर्यंत आकारानुसार ओल्डमॅन तयार केले जात आहेत. येत्या दोन दिवसात रंगकामाला सुऊवात होणार आहे.

गवळी गल्ली, पॅम्प येथे 25 फुटी ओल्डमॅन

पॅम्प येथे दरवषी नववर्षाची वेगळी धूम पाहायला मिळते. यावषीही पॅम्प भागात ओल्डमॅन तयार करण्यास सुऊवात करण्यात आली आहे. गवळी गल्ली येथील जीजीवायएम बॉईज मंडळाकडून 25 फुटी भव्य ओल्डमॅन तयार करण्यात येत आहे. यावषी  राक्षसाच्या रुपात ओल्डमॅन तयार केला जात आहे. यामध्ये असीम पानवाले, शुभम काकतीकर, खुशी साळुंखे, प्रणय मरशेट्टी, नैतिक संकरांवर, मैजुद्दीन सय्यद, नक्ष कोष्टी, प्रणय जाधव, ओमकार सातार्डेकर, टिसियानो परेरा हे ओल्डमॅन तयार करण्यासाठी मेहनत घेत आहेत.

Advertisement
Tags :

.