महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नवे वर्ष...नवे प्रारंभ !

06:34 AM Jan 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काय परिवर्तने घडणार या वर्षात

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

नूतन सौरवर्ष 2025 चा प्रारंभ आता झाला आहे. या वर्षात काय घडणार, कोणती परिवर्तने कोणत्या क्षेत्रांमध्ये होणार, यासंबंधी प्रत्येकाच्या मनात उत्सुकता आहे. प्रत्येक नव्या वर्षाप्रमाणे हे वर्षही आपल्यासमवेत अशी अनेक परिवर्तने घेऊन येत आहे. आर्थिक क्षेत्रापासून सांस्कृतिक क्षेत्रापर्यंत अनेक नवे प्रारंभ आणि परिवर्तने आपल्याला या वर्ष 2025 मध्ये अनुभवायला मिळणार आहेत.

कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांना दिलासा देणारे हे वर्ष असेल. कारण त्यांना विनाहमी मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा 2 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. ही मर्यादा 1 लाख 60 हजार रुपयांची होती. डिसेंबरमध्ये या वाढीची घोषणा करण्यात रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात करण्यात आली आहे. याचा लाभ अल्पभूधारकांना होणार आहे. विनाहमी कर्जाची मर्यादा वाढल्याने शेतकऱ्यांची सोय होणार आहे.

स्मार्टफोन नसलेल्यांचीही सोय

ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, त्यांच्यासाठी मोबाईल कंपन्या स्वतंत्र रीचार्ज पॅक देणार आहेत. या सोयींमध्ये व्हॉईसकॉल आणि एसएमएसची सुविधा असेल. सध्या ही सुविधा अशा फोनधारकांना अनेक सुविधांमधून निवडावी लागते. नूतन वर्षापासून ती आपोआप आणि कोणत्याही अटींविना मिळणार आहे.

निवृत्तीवेतनधारकांसाठी आनंदवार्ता

नूतन वर्षापासून निवृत्तीवेतनधारकांसाठी नवे नियम लागू होत आहेत. नव्या नियमांच्या अनुसार त्यांना त्यांचे निवृत्तीवेतन (पेन्शन) कोणत्याही बँकेतून काढता येणार आहे. सध्याच्या नियमानुसार निवृत्त लोकांना त्यांचे निवृत्तीवेतन केवळ त्यांचे खाते असलेली बँक आणि शाखेतूनच काढता येते. आता नवी सुविधा मिळेल.

वाहनप्रदूषणावर निर्बंध

सध्या वाहनांपासून होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘भारत पातळी 6’ चे निकष लावले जात आहेत. हे निकष एप्रिल 2019 पासून आहेत. नववर्षापासून यापेक्षा कठोर निकष लागू करण्यात येत आहेत. ते ‘भारत पातळी 7’ म्हणून ओळखले जात आहेत. तथापि, ते 1 जानेवारीपासून नव्हे, तर 1 एप्रिल 2025 पासून लागू केले जातील, अशी माहिती देण्यात आली आहे.

अग्निवीरांना संधी

नूतन वर्षापासून अग्निवीरांना सीआयएसएफ आणि सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) आरक्षण लागू पेले जाणार आहे. सध्या अग्निवीरांना भारतीय सैन्यात 25 टक्के आरक्षण आहे. त्यासमवेत आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि सीमा सुरक्षा दलातही 10 प्रतिशत आरक्षण मिळेल.

अल्पबचतीचे व्याजदर आहेत तेच

अल्पबचतीच्या व्याजदरांमध्ये नवीन वर्षात अबाधित राहतील. गेल्या वर्षी जे दर होते, तेच यावर्षीही राहतील. सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीवर (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) सध्या 7.1 प्रतिशत या दराने व्याज मिळत आहे. तर ‘सुकन्या समृद्धी’ योजनेतील गुंतवणुकीवर 8.2 प्रतिशत व्याज दिले देण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांनो सतर्क रहा...

इयत्ता आठवी पर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण करायचे नाही, हा नियम नववर्षापासून जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता त्यांच्या शालेय जीवनात प्रत्येक वर्षी उत्तीर्ण व्हावे लागणार असून अनुत्तीर्ण झाल्यास दोन महिन्यात पुन्हा परीक्षा देऊन उत्तीर्ण व्हावे लागेल. अन्यथा, त्यांना त्याच वर्गात बसावे लागेल. विद्यार्थ्यांनी अधिक लक्ष देऊन अभ्यास करावा आणि शिक्षकांनीही त्यांना अधिक गांभीर्याने शिकवावे, यासाठी हे नियम परिवर्तन करण्यात आले आहे. हीच व्यवस्था पूर्वीही होती. तथापि, गेल्या दशकात ती काढून टाकण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांनच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.

शिकवणी, कोचिंग क्लासेसवर निर्बंध

केंद्र सरकारने प्रथमच शिकवणी वर्ग किंवा कोचिंग क्लासेसवर निर्बंध आणण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यामुळे कोणत्याही शिकवणी वर्गांमध्ये 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही. तसेच अशा शिकवणी वर्गांच्या व्यवस्थापनांना दिशाभूल करणाऱ्या जाहीराती प्रसिद्ध करता येणार नाहीत. या निर्बंधांचा भंग करणाऱ्या क्लासेसना मोठा दंड भरावा लागेल, किंवा त्यांची मान्यता रद्द केली जाईल, नवे नियम नूतन वर्षात लागू केले जातील. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हे नवे नियम करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

साऱ्यांना लक्ष द्यावे लागणार...

ड नूतन वर्षात अनेक क्षेत्रांमधील नियम जाऊन नवे नियम येणार

ड विद्यार्थ्यांना आता अधिक दक्षतापूर्वक अभ्यास करावा लागणार

ड अल्पबचत खाती आणि सार्वजनिक निर्वाहनिधीवर व्याजदर तेच

ड शेतकऱ्यांना नूतन वर्षापासून 2 लाखाचे विनाहमी कर्ज मिळणार

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article