आंध्रप्रदेशात सरड्याच्या नव्या प्रजातीचा शोध
भारतीय प्राणी सर्वेक्षणाच्या वैज्ञानिकांना यश
वृत्तसंस्था/ अमरावती
कोलकाता येथील भारतीय प्राणी सर्वेक्षणाच्या (झेडएसआय) वैज्ञानिकांनी आंध्रप्रदेशात सरड्याच्या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. हेमीफिलोडॅक्टायलस वंशाशी संबंधित नव्या प्रजातीच हा सरडा आंध्रप्रदेशच्या शेषाचलम बायोस्फीयर रिझर्व्हमध्ये तिरुमाला पर्वतरांगेत आढळून आला आहे.
सरड्याच्या या नव्या प्रजातीचे नाव ‘हेमीफिलोडेक्टायलस वेंकटाद्रि स्पेसीज नोव’ ठेवण्यात आले आहे. हे नाव तिरुमालामध्ये पवित्र वेंकटाद्रि पर्वतांबद्दल सन्मान दर्शविणारे आहे. आंतरराष्ट्रीय नियतकालिकत हरपेटोजोआमध्ये हा शोध प्रकाशित करण्यात आला आहे. झेडएसआयच्या ‘फ्रेशवॉटर बायोलॉजी रिजनल सेंटर (हैदराबाद), रेप्टिलिया विभाग (कोलकाता) आणि फकीर मोहन विद्यापीठाच्या (ओडिशा) एका टीमच्या संयुक्त प्रयत्नाच्या अंतर्गत हा शोध लावण्यात आला आहे.
सरड्याच्या नव्या प्रजातीच्या स्वरुपात याच्या स्थितीची पुष्टी विश्लेषणातून झाली आहे. भारतीय उपखंडात स्वत:च्या निकट संबंधी प्रजातीशी 9.7-12.9 टक्के आनुवंशिक विचलन दर्शविणारी ही प्रजाती आहे. या निकटवर्तीय प्रजातामध्ये एच. ज्ञान, एच. नीलगिरीपुंसिस आणि एच. प्रायद्वीपीय सामील आहे. आंध्रदेशात शोधण्यात आलेल्या हेमीफिलोडॅक्टायलस वंशाची ही केवळ दुसरी प्रजाती आहे, पहिली एच. अराकुएंसिस होती अशी माहिती झेडएसआयच्या संचालिक धृति बॅनर्जी यांनी दिली आहे.