For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डीपफेक विरोधात 7 दिवसात नवे नियम

06:31 AM Jan 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
डीपफेक विरोधात 7 दिवसात नवे नियम
Advertisement

सोशल मीडिया फर्म्सवर कारवाई होणार : केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

डीपफेकसंबंधी केंद्र सरकार नवे नियम आणणार आहे. डीपफेकच्या मुद्द्यावरून दोन बैठका पार पडल्या असल्याची माहिती केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मंगळवारी दिली आहे. नव्या आयटी नियमांमध्ये चुकीची माहिती आणि डीपफेकसंबंधी महत्त्वाच्या तरतुदी असून त्यांचे पालन करणे सर्वांसाठी अनिवार्य असेल. या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. पुढील 7-8 दिवसांमध्ये नवे आयटी नियम अधिसूचित करण्यात येणार असल्याचे चंद्रशेखर यांनी सांगितले आहे.

Advertisement

डीपफेक लोकशाहीसाठी एक नवा धोका ठरला आहे. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी डीपफेकचा धोका आणि त्याचे गांभीर्य मान्य केले आहे. डीपफेकचे निर्माते आणि ते प्रसारित करणाऱ्या प्लॅटफॉर्मची जबाबदारी निश्चित केली जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते.

मोदी, तेंडुलकरचा डीपफेक व्हिडिओ

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील डीफफेकसंबंधी चिंता व्यक्त केली आहे. मोदींसंबंधी एक डीपफेक व्हिडिओ आला होता. तर अलिकडेच सचिन तेंडुलकर यांचा एक डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर नोव्हेंब महिन्यात अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

डीपफेक म्हणजे काय?

डीपफेक शब्द पहिल्यांदा 2017 मध्ये वापरला गेला होता. तेव्हा अमेरिकेतील सोशल न्यूज एग्रीकेटर रे•िटवर डीपफेक आयडीद्वारे अनेक सेलिब्रिटींचे व्हिडिओ पोस्ट करण्यात आले होते. यात अभिनेत्री एमा वॉटसन, गॅल गॅडोट, स्कार्लेट जॉन्सन यांना लक्ष्य करण्यात आले होते. एखाद्या व्हिडिओ, फोटो किंवा ऑडिओत दुसऱ्याचा चेहरा, आवाज किंवा हावभाव फिट करण्याच्या कृतीला डीपफेक नाव देण्यात आले आहे. डीपफेक व्हिडिओ पाहिल्यास तो फेक असल्याचे वाटत नाही. यात फेक देखील खरेखुरे वाटत असते. डीपफेककरता मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजेन्सची मदत घेतली जाते. यात व्हिडिओ आणि ऑडिओला तंत्रज्ञान तसेच सॉफ्टवेअरच्या मदतीने तयार करण्यात येते.

Advertisement
Tags :

.