महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी नवी नियमावली

11:21 AM Oct 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वैद्यकीय शिक्षणमंत्री शरणप्रकाश पाटील यांचे आदेश : सिव्हिल हॉस्पिटलमध्ये महिलांच्या सुरक्षिततेला राज्य सरकारचे प्राधान्य

Advertisement

बेळगाव : वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारने नवीन नियमावली तयार केली आहे. त्याची अंमलबजावणी करत सिव्हिल  हॉस्पिटलमध्ये महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. सीसीटीव्ही, स्वतंत्र स्वच्छतागृह, स्वतंत्र ड्युटी रुम, वाहन सुविधा, निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांची नेमणूक व रात्रीची गस्त असे सर्व बदल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करण्यात आले आहेत. कोलकाता येथील आर. जी. कर  कॉलेजमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. या घटनेने देशभरातील नागरिकांमध्ये व डॉक्टरांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा या घटनेने पुन्हा एकदा ऐरणीवर आला. कोलकाता येथील डॉक्टरांनी तर उपोषणाचे हत्यार उगारले.

Advertisement

बेळगावमधील डॉक्टरांनीसुद्धा या विरोधात निषेध मोर्चा काढला. केएलई हॉस्पिटल व मराठा मंडळ डेंटल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भव्य मोर्चा काढून आपला निषेध नोंदविला. आयएमएने नुकत्याच दिलेल्या उपोषणाच्या हाकेला बेळगाव शाखेच्या आयएमएने प्रतिसाद दिला. या सर्व संघ-संस्था व देशभरातील वैद्यक संघटनांनी डॉक्टरांच्या सुरक्षिततेची मागणी केली. तसेच महिला  डॉक्टरांना निर्भयपणे काम करता यावे, यासाठी काही मागण्या केल्या. याची नोंद घेत राज्य सरकारने नवीन मार्गदर्शक प्रणाली तयार केली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री शरणप्रकाश पाटील यांनी तसे आदेश सर्व वैद्यकीय संघटना, हॉस्पिटल्स यांना दिले आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत, हे महत्त्वाचे आहे.

बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शेकडो महिला डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी काम करतात. या हॉस्पिटलमध्ये दररोज हजारो रुग्ण येतात. महिला डॉक्टरांना परिचारिकांना रात्रपाळी करावी लागते. हे लक्षात घेऊन सिव्हिल  हॉस्पिटलमध्ये बिम्स प्रशासनाने आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. मार्गदर्शक प्रणालीनुसार हॉस्पिटलमध्ये माजी लष्करी अधिकाऱ्यांची नेमणूक करणे बंधनकारक आहे. हे अधिकारी व कर्मचारी महिलांच्या सुरक्षिततेची पूर्णपणे जबाबदारी घेतील. सर्व महत्त्वाच्या ठिकाणी व खोल्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले असून कंट्रोल रुममधून त्याचे फुटेज पाहणे शक्य आहे. रात्रपाळी करणाऱ्यांना योग्य ती सुरक्षितता देण्यात येत आहे.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता महिला डॉक्टरांसाठी स्वतंत्र ड्युटी रुम असून महत्त्वाच्या सर्व ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. रात्रपाळी करणाऱ्या महिला डॉक्टर व परिचारिकांना क्वॉर्टर्स (निवास) पासून कामाच्या ठिकाणी म्हणजेच कॅज्युअल्टिपर्यंत येण्यासाठी वाहन सुविधा देण्यात आली आहे. या मार्गावर सीसीटीव्हीची सोय आवश्यक असल्याचे सरकारने कळविले आहे. याशिवाय रात्रभर वाहनामधून सुरक्षा कर्मचारी गस्त घालत आहेत. सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना विशिष्ट रंगाची ओळखपत्रे देण्यात आली आहेत. सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून काटेकोर तपासणीनंतर रुग्ण आणि त्याच्या साहाय्यकांना प्रवेश देण्यात येत आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार अंतर्गत तक्रार समिती स्थापन करण्यात आली असून आठवड्यातून एकदा या समितीची बैठक होत आहे. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये हिंसाचार प्रतिबंधक समिती, अंतर्गत तक्रार समिती, हॉस्पिटल सुरक्षा समिती कार्यरत आहे.

तक्रारीसाठी गुलाबी रंगाची पेटी

बऱ्याचदा अब्रु, नोकरीची गरज यामुळे महिला त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची वाच्यता करत नाहीत. हे लक्षात घेऊन आता नवीन मार्गदर्शक प्रणालीनुसार प्रत्येक हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजमध्ये गुलाबी रंगाच्या तक्रार पेटी बसविण्यात आल्या आहेत. या ठिकाणी पीडित महिला आपली तक्रार नोंदवू शकते. तिचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.

निर्भयपणे काम करण्यावर भर

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सरकारने दिलेल्या मार्गदर्शक प्रणालीनुसार सर्व सोयीसुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. महिलांना निर्भयपणे काम करता येईल, असे वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. निवृत्त लष्करी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. गुलाबी तक्रार पेटी बसविण्यात आली असून कोणतीही अनुचित घटना घडणार नाही यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

-डॉ. अशोककुमार शेट्टी, वैद्यकीय संचालक, बिम्स

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article