For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिरशिंगे गावातील ३ वाड्यांसाठी नवीन वीजवाहिनी मंजूर करावी

05:52 PM Aug 04, 2024 IST | अनुजा कुडतरकर
शिरशिंगे गावातील ३ वाड्यांसाठी नवीन वीजवाहिनी मंजूर करावी
Advertisement

ग्रामस्थांची मागणी ; अन्यथा १५ ऑगस्टला उपोषण

Advertisement

ओटवणे | प्रतिनिधी
शिरशिंगे गावातील गोठवेवाडी, परबवाडी, मळईवाडी या तीन वड्यांचा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मिटण्यासाठी गोठवेवाडी, परबवाडी, मळईवाडी जाणारी इलेव्हन (११) के.वी. लाईन रस्त्याच्या बाजूने नव्याने मंजूर करण्यात यावी. यासाठी तात्काळ कार्यवाही न केल्यास १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी येथील वीज वितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा शिरशिंगे ग्रामस्थांच्यावतीने सावंतवाडी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.शिरशिंगे येथील धरण क्षेत्राच्या वरच्या भागात गोठवेवाडी, परबवाडी, मळईवाडी या वाड्या येतात. या वाड्यात जाणारी (११) इलेव्हन के.वी. लाईन धरण चालू करताना तात्पुरत्या स्वरुपात घनदाट जंगल व दऱ्यांमधून देण्यात आलेली होती. या भागात घनदाट जंगल भागातून वीज वाहिनी गेल्याने विज लाईन वेळोवेळी नादुरुस्त होते. दरवर्षी पावसाळ्यात अशीच स्थिती होते. या तीन वाड्यात साधारणपणे १००० लोकवस्ती असून याचा परिणामी शाळेतील मुले यांच्या अभ्यासावर होतो. त्यामुळे आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करुन ११ केव्ही लाईन धरण क्षत्रातील कायमस्वरुपात काढण्यात आलेल्या पर्यायी रस्त्यावरुन घेण्यात यावी. यासाठी महावितरणला लागणारे सर्व सहकार्य करायला ग्रामस्थ तयार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी उपकार्यकारी अभियंता श्री चव्हाण यांनी याबाबत कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगितले.यावेळी शिरशिंगे माजी सरपंच सुरेश शिर्के, शिवसेना शिंदे गट उपतालुकाप्रमुख जीवन लाड, श्री सुर्वे, बाबू सुर्वे,श्री शिर्के श्री घावरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.