महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

नववीपासून नवे धोरण लागू

12:41 PM May 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत शिक्कामोर्तब : कला, व्यावसायिक शिक्षकांची भरती करणार

Advertisement

पणजी : आगामी शैक्षणिक वर्षात म्हणजे 2024 - 25 मध्ये इयत्ता नववीसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची कार्यवाही करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यासाठी झालेल्या आढावा बैठकीत सदर निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. शिक्षणमंत्री असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पर्वरी सचिवालयात बैठक घेण्यात आली. ते म्हणाले की, ऑगस्ट महिन्यापासून ते धोरण नववीसाठी राबवण्यात येणार आहे. नववीसाठी हे धोरण लागू करताना कला, व्यावसायिक स्टडी अंतर्गत शिस्तबद्धता हे विषय शिकवण्यासाठी शिक्षक असणे महत्त्वाचे आहे. सध्या तरी ते शिक्षक उपलब्ध नाहीत म्हणून जून, जुलै असे दोन महिने शिक्षक मिळणार नाहीत, परंतु ऑगस्ट महिन्यापासून ते शिक्षक उपलब्ध होतील. वरील विषयांचा अभ्यासक्रम तयार कऊन तो सर्व शाळांना पाठवला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

Advertisement

शिक्षकांना प्रशिक्षण देणार

शाळेत इतर विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना शैक्षणिक धोरणानुसार शिकवणीचे अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे धोरण लागू करताना सर्व तयारी असणे आवश्यक आहे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक यांना शिक्षण खात्यातर्फे नवीन धोरणाची तपशीलवार माहिती देण्यात येणार आहे. कला विषयासाठी एससीईआरटीतर्फे शिक्षकांची सोय करण्यात येणार असून त्या सर्वांनी या नवीन धोरणाची माहिती मिळवून त्यासाठी स्वत:ला अवगत करावे, असेही डॉ. सावंत म्हणाले.

रिक्त 180 शिक्षकांच्या भरणार

सध्या सुमारे 180 शिक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत. त्यांची भरती युद्धपातळीवर केली जाणार असून सर्व शिक्षकांना नवीन धोरणानुसार प्रशिक्षित करण्याचा इरादा आहे. एससीईआरटीला स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळावा म्हणून प्रस्ताव विचाराधीन आहे, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले. या बैठकीत नवीन शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा झाली. शिक्षण खाते सचिव प्रसाद लोलयेकर आणि शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे व इतर मान्यवर मंडळी बैठकीला हजर होती.

भूगोल व्यावसायिक अभ्यासक्रमात

भूगोल विषय व्यावसायिक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला असून भूगोलच्या शिक्षकांना विशेष प्रशिक्षण मिळणार आहे. कला शिक्षकांची समस्याही दूर केली जाणार असून हे धोरण उच्च शिक्षणासाठी पुरक ठरणार असल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केला आहे. अकरावी प्रवेशासाठी कसलाच गोंधळ नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

शिक्षक, प्रशासक, शिक्षणतज्ञाना चिंता

प्रथम नववीमध्ये हे धोरण लागू करण्याचे ठरविले असून नंतर ते हळूहळू दहावी व पुढील उच्च वर्गात नेण्यात येणार आहे. ते थेट उच्च वर्गात लागू करण्याबाबत मतांतरे असल्याचे समोर आले आहे. शाळेतील शिक्षक, प्रशासक, शिक्षणतज्ञ यांना त्याबाबत चिंता लागून होती. या धोरणांमुळे विषयातही बदल होणार असून त्यानुसार शिक्षक असणे किंवा त्यांना प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. परंतु शिक्षकांची तयारी नवीन धोरणासाठी अद्याप झालेली नाही. ती झाल्याशिवाय नवीन धोरण पुढे नेणे घाईचे ठरणार असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. सदर नवीन धोरणात तिसऱ्या भाषेवर अन्याय होणार असून विद्यार्थी देशी भाषा सोडून परदेशी भाषांचा पर्याय निवडतील, अशी भीती आहे. नववीसाठी प्रायोगिक तत्वावर हे धोरण राबवणार असे दिसते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article