जीम ओनर्स असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
बेळगाव : बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशन व स्पोर्ट्स अस्मीता क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बेळगाव जिल्हा जिम असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जीमच्या माध्यमातून बेळगाव मधील युवक युवतीना व्यसनापासून दूर ठेवत त्यांची शरीरयष्टी बळकट करुन व्यायामपटू घडवणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही आज बेळगावत 120 हून अधिक जिमची उभारणी केली आहे. कोणत्याही संघटनेने व्यायामपटूना स्पर्धेत भाग घेण्यासाठी अडथळा आणू नये, असे उद्गार जिम असोसिएशनचे अध्यक्ष चेतन ताशिलदार यांनी सत्काराला उत्तर देताना काढले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सचिव राजेश लोहार, अनिल आंबरोळे, खजिनदार नारायण चौगुले, प्रकाश कालकुंद्रीकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बेळगाव जिल्हा जिम ओनर्स असोसिएशन पदाधिकारी अध्यक्ष चेतन ताशिलदार, सचिव क्रितेश कावळे, किरण कावळे, नागेंद्र मडिवाळ, राकेश वाधवा, विजय चौगुले, सचिन मोहिते, जय निलजकर, विशाल चव्हाण, जय कामू, दयानंद निलजकर, शेखर जानवेकर, किरण पाटील, राजकुमार बोकडे, सुरेश धामणेकर, अश्विन हिंगणावर, सलमान के., यश गस्ती आदींचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी अस्मिता क्रियेशनचे संतोष सुतार, सुनील चौधरी, सुनील बोकडे, रणजीत किल्लेकर, भरत बाळेकुंद्री, राजू पाटील, विनोद मेत्री, पवन हसबे ,तुषार कवाडे, विशाल गवळी, गुरुनाथ बेडारे, ऐश्वर्या कुरंगी प्रल्हाद पाटील आदी उपस्थित होते.