नगरसेवकांकडून नूतन मनपा आयुक्तांचे स्वागत
12:25 PM Dec 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : महापालिका नूतन आयुक्त म्हणून रुजू झालेल्या कार्तिक एम. यांचे विरोधी गटातील नगरसेवकांच्यावतीने मंगळवार दि. 2 रोजी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. मावळत्या मनपा आयुक्त शुभा बी. यांची बदली होऊन त्यांच्या जागी नूतन मनपा आयुक्त म्हणून कार्तिक एम. यांची वर्णी लागताच त्यांनी तातडीने बेळगाव महानगरपालिकेत रुजू होऊन सूत्रे स्वीकारली. त्यामुळे त्यांचे विरोध गटातील नगरसेवकांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विरोधी गटाचे माजी गटनेते मुजम्मील डोणी, नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, रियाज किल्लेदार यांच्यासह इतर लोकनियुक्त नगरसेवक व सरकार नियुक्त सदस्य उपस्थित होते.
Advertisement
Advertisement